अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खाजगी आस्थापनेला, मध, गायीचे तूप आणि खाद्य तेल यांच्यासंबंधी 100 टक्क्यांचा दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणार आहे. आहे.
प्राधिकरणानं समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकाराचा दिशाभूल कऱणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, ॲपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गाईचे तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे.