व्यवसाय

June 6, 2025 7:36 PM

views 49

शेअर बाजारात रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स ७४७ अंकांनी वधारुन ८२ हजार १८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५२ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ३ अंकांवर स्थिरावला. बँका आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते.

June 1, 2025 3:09 PM

views 51

व्यावसायिक गॅस सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त

देशातल्या १९ किलोच्या व्यावसायिक  गॅस सिलिंडरच्या किंमती २४ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे. आता व्यावसायिक सिलिंडर दिल्लीत १ हजार ७२३ रुपयांना, मुंबईत १ हजार ६७४ रुपये, कोलकाता १ हजार ८२६, चेन्नईत १ हजार ८८१, बंगळुरूत १ हजार ७९६, नोएडा १ हजार ७२३ आणि चंडीगडमधे १ हजार ७४३...

May 30, 2025 7:29 PM

views 82

भारताच्या परकीय चलन साठ्यात ६.९ अब्ज डॉलर्सची वाढ

गेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात ६ पूर्णांक ९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून तो ६९२ अब्ज ७० कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या साप्ताहिक सांख्यिकी पुरवणीत ही माहिती दिली आहे.  गेल्या आठवड्यात, परकीय चलन मालमत्ता ४५० कोटी डॉलर्सनं वाढून ५८६ अब्ज १० कोटी डॉलर्सवर पोचली.  ...

May 30, 2025 7:09 PM

views 283

भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5 % राहण्याचा अंदाज

आर्थिक वर्ष २०२४- २५ मधे भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहील, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागानं व्यक्त केला आहे. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७ पूर्णांक ४ दशांश टक्के दरानं वाढीचं अनुमान आहे.    या वर्षातल्या एकंदर जीडीपी वाढीचा दर ९ पूर्णांक ८ दश...

May 30, 2025 1:21 PM

views 69

वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल – RBI

चालू आर्थिक वर्षात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. सरकारचा भांडवली खर्चावर भर, खासगी क्षेत्राची वाढ, बँका आणि भांडवली बाजारांचा अचूक ताळेबंद यामुळे भारताची अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहिल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. उत्पादन क्षेत्रात च...

May 28, 2025 9:35 AM

views 82

देशात ८१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक

देशात गेल्या आर्थिक वर्षात ८१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ती १४ टक्के अधिक आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, यापैकी १९ टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली. तर संगणक सॉफ्टवेअर, हार्डवेअर क्षेत्राला १६ टक्के आणि व्यापार...

May 27, 2025 8:34 PM

views 47

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची मुदत केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. विवरण पत्र भरण्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात विलंब झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षी ३१ जुलै पर्यंत करदात्यांना परताव्यासाठी विवरणपत्र भरता येतात. मात्र, यंदा १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवल्याच...

May 25, 2025 7:17 PM

views 57

डॉलरच्या घसरणीमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात सर्वोच्च वाढ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या घोषणेनंतर आणि डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीत सर्वोच्च वाढ नोंदवली गेली. या आठवड्यात सोन्याचे दर पाच टक्क्यांनी वाढून ३ हजार ३५७ डॉलर्स प्रतिऔंस इतके झाले आहेत. या आठवड्यात चांदीच्या किमतीतही ३३ डॉलर्स प्रति औंस इतक...

May 25, 2025 7:06 PM

views 56

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांची सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांनी मे २०२५ मधे आतापर्यंत सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अधिकृत आकडेवारी सांगते की, या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी १३ हजार ८३५ रुपये भारतीय समभाग बाजारांमधे गुंतवले मात्र ऋण बाजारातून ७ हजार ७४३ कोटी रुपये काढून घेतले. एप्रिलमधे ४ हजार २...

May 25, 2025 1:45 PM

views 64

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता केंद्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणेच ८.२५ टक्के दर जाहीर केला आहे. याचा लाभ देशातल्या सात कोटीपेक्षा जास्त पगारदारांना मिळत आहे. २०२२- २३ मधे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीतल्या ठेवींवर ८ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज मिळत होतं. गेल्या आर्थिक वर्षा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.