केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत.
News On AIR | अगस्त 1, 2026 12:12 अपराह्न
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर