November 3, 2025 9:24 AM

views 77

प्रधानमंत्र्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘Modi’s Mission’ या पुस्तकाचं प्रकाशन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित Modi’s Mission या पुस्तकाचं प्रकाशन आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात झालं. प्रख्यात वकील बर्जिस देसाई यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

October 21, 2025 3:04 PM

views 99

दिवाळीनिमित्त प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना शुभेच्छा पत्र

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिवाळीनिमित्त देशवासियांना उद्देशून शुभेच्छा पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद दिल्याबद्दल ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा केली आहे.    याशिवाय, यावर्षीची दिवाळी खास आहे कारण, पहिल्यांदाच, देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये, दुर्गम भागांमध्ये दिपोत्सव होत आहे. हे असे जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट झाला आहे."   "आपण नजीकच्या भविष्यात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आ...

October 21, 2025 9:38 AM

views 87

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली – प्रधानमंत्री

देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते. आयएनएस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक आहे. ही केवळ एक युद्धनौका नाही, तर २१ शतकातल्या भारताच्या परिश्रम, प्रतिभा आणि वचनबद्ध...

October 16, 2025 8:33 PM

views 105

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात विविध विकासकामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्रप्रदेशातल्या कुरनूल इथं १३ हजार ४३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. उद्योग, ऊर्जा, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूू क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत.     देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचली असून वीज वापर १४०० युनिटनं वाढल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. ऊर्जा क्षेत्रात भारत नवे मापदंड तयार करत आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं उभारल्या जाणाऱ्या एआय हब...

October 15, 2025 7:39 PM

views 176

Bihar Elections : प्रधानमंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बुथस्तरावरच्या कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद साधला. रालोआसाठी एकत्रित काम करण्याचं आवाहन यावेळी मोदी यांनी केलं. संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पार्टी रामविलास, राष्ट्रीय लोकमोर्चा आणि हिंदुुस्तानी आवाम मोर्चा हे भाजपाचे मित्रपक्ष असून यांच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. लोककल्याणकारी योजनांविषयी जनजागृती करावी असंही मोदी यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. 

October 13, 2025 8:18 PM

views 55

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली प्रधानंमत्री मोदींची भेट

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-कॅनडा द्विपक्षीय भागीदारीला नवीन गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी ही भेट महत्त्वाची असल्याची भावना प्रधानमंत्र्यांनी त्यांचं स्वागत करताना व्यक्त केली. व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती आणि सामाजिक संबंधांमध्ये दोन्ही देशांमधल्या वाढत्या सहकार्याचं महत्त्व देखील मोदी यांनी अधोरेखित केलं. या भेटीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या भेटीसाठी उत्...

October 12, 2025 2:01 PM

views 241

महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र

महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागावसह, पालघरमधल्या पर्णका, तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती जाहीर केली. जागतिक स्तरावर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक समुद्र किनाऱ्यांना डेन्मार्कच्या फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन संस्थेकडून ३३ निकषांच्या मूल्यमापनातून हे मानांकन दिलं जातं. प...

October 2, 2025 1:26 PM

views 104

समाजाची सेवा आणि राष्ट्रनिर्माणाचं उद्दिष्ट समोर ठेवून संघाची स्थापना झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

समाजाची सेवा आणि राष्ट्रनिर्माणाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून १०० वर्षापूर्वी संघाची स्थापना झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हटलं आहे. संघाच्या शताब्दीनिमित्त विविध वृत्तपत्रात त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. गेल्या १०० वर्षात संघानं लाखो स्वयंसेवकांना घडवलं आणि संघांच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ते कार्यरत होते, असं प्रधानमंत्र्यांनी या लेखात नमूद केलं आहे. 

October 2, 2025 9:21 AM

views 127

देशभरात विजयादशमीचा उत्साह, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना 121 व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 156 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, लाल बहादूर शास्त्री यांच्या सचोटी, नम्रता आणि दृढनिश्चयाने आव्हानात्मक काळात राष्ट्राला बळकटी मिळाल्याचं नमूद केलं. तर ज्यांच्या आदर्शांमुळे मानवी इतिहासाचा मार्ग बदलला अशा असाधारण जीवनाला आदरांजली वाहण्याची संधी म्हणजे गांधी जयंती. गांधीजींच्या विचारसरणीचा गौरव करताना, धैर्य आण...

October 1, 2025 1:50 PM

views 127

RSSच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त नवी दिल्लीच्या आंबेडकर भवनात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्र उभारणीतलं आणि संस्कृती संवर्धनातलं योगदान याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना म्हणजे हजारो वर्ष चालत आलेल्या  परंपरेचं पुनरुज्जीवन होतं असं ते म्हणाले. संकटकाळी मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या स्वयंसेवकांबद्द्ल त्यांनी आदर व्यक्त केला.   १९६३ मध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त झालेल...