January 23, 2026 12:57 PM

views 88

केरळमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये विविध विकासकामांची  पायाभरणी आणि लोकार्पण केलं. रेल्वे जोडणी, शहरी रोजगार, विज्ञान-तंत्रज्ञान, नागरिककेंद्री सेवा आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांशी संबंधित प्रकल्पांचा यात समावेश आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आणि केंद्र सरकारनं गेल्या ११ वर्षांमध्ये विविध समाजघटकांसाठी सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख केला. यावेळी तीन अमृत भारत रेल्वेगाड्या आणि एका प्रवासी रेल्वेला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. तसंच पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड्सचं अना...

January 17, 2026 1:29 PM

views 127

प्रधानमंत्र्यांनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोककल्याणकारी कारभारावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.   राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं यश म्हणजे व्यापक हिंदुत्व, पारदर्शकता, समावेशक विकासाला महाराष्ट्रानं दिलेला कौल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.   मनसेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे. ही निवडणूक सोपी नव्हत...

January 16, 2026 4:07 PM

views 85

स्टार्टअप अभियानानं गेल्या १० वर्षांमधे क्रांती घडवून आणली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

स्टार्ट अप अभियानाने गेल्या १० वर्षांमधे क्रांती घडवून आणली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. प्रत्यक्ष समस्यांना भिडण्याचं उद्दिष्ट युवकांनी ठेवलं असून त्यांच्या स्वप्नांचा प्रवास या दहा वर्षात अनुभवला असल्याचं ते म्हणाले.   केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितलं की २०१६ मधे ही मोहीम सुरु झाली त्यावेळी अवघे ४०० स्टार्टअप होते, ती संख्या आता दोन लाखांवर...

January 16, 2026 1:16 PM

views 97

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्टार्ट अप महोत्सवाचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं स्टार्ट अप महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. स्टार्ट अप संकल्पना कार्यान्वित झाल्याच्या दशकपूर्तीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. १६ जानेवारी २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला होता. नवोन्मेषाला चालना, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि गुंतवणूक-आधारित विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजपर्यंत भारतात दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता मिळाली आहे. २०१४ नंतर दीड लाखापेक्षा ...

January 10, 2026 12:08 PM

views 86

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ स्वाभिमान पर्वासह विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. गीर सोमनाथ जिल्ह्यातल्या वेरावल इथं गुरुवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या सोमनाथ स्वाभिमान पर्वात सोमनाथ मंदिराच्या चिरस्थायी प्रेरणेचं स्मरण केलं जाणार आहे. याशिवाय, या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री मोदी राजकोट इथं व्हायब्रंट गुजरात स्थानिक परिषदेचं उद्घाटन करतील, तर गांधीनगर इथं जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिच मर्ज यांची भेट घेतील.

January 3, 2026 1:43 PM

views 72

भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत आहे. भगवान बुद्ध सर्वांचे आहेत आणि ते सर्वांना जोडून ठेवतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीतल्या राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, भगवान बुद्धांशी संबंधित, पवित्र पिप्रावा अवशेषांच्या, भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे अवशेष भारतात परत आल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.   हे अवशेष भारताबाहेर नेणाऱ्यांसाठी ...

January 3, 2026 9:48 AM

views 71

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, भगवान बुद्धांशी संबंधित, पवित्र पिपरहवा अवशेषांच्या, भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन करतील. इतिहास, संस्कृती आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांबद्दल प्रेम असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप खास असल्याचा उल्लेख समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये प्रधानमंत्र्यांनी केला आहे.   शतकाहून अधिक काळानंतर परत आणलेले पिपरहवा अवशेष आणि राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली तसंच भारतीय संग्रहालय कोलकाता, यांच्या संग्रहात जतन केलेले, पिपरहवा इथले, अ...

December 30, 2025 8:21 PM

views 125

२०४७ मधला विकसित भारत हीच भारताची धोरणप्रक्रिया आणि अर्थसंकल्पाची दिशा असायला हवी – प्रधानमंत्री

२०४७ मध्ये भारताला विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच  भारताची धोरणप्रक्रिया आणि अर्थसंकल्पाची दिशा असली पाहिजे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठकीत अर्थतज्ञ आणि इतर क्षेत्रातल्या तज्ञांना ते संबोधित करत होते. विकसित भारतासाठी आत्मनिर्भरता आणि रचनात्मक बदल ही या बैठकीमागची संकल्पना होती. विकसित भारताचं सरकारचं उद्दिष्ट जनसामान्यांमध्ये पोहोचल्याचं ते यावेळी म्हणाले.    अर्थतज्ञांनी या बैठकीत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातली उत्पादनक्ष...

December 29, 2025 1:44 PM

views 90

सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

भारताला जागतिक सेवापुरवठ्याचं महाकेंद्र बनवण्यासाठी सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन द्यावं तसंच व्यवसायसुलभ धोरणांना चालना द्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते.   प्रत्येक राज्यानं या परिषदेत झालेल्या विचारविनिमयाला अनुसरुन १० वर्षांसाठीचा कृती आराखडा तयार केला पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं. लवकरच देशाचं राष्ट्रीय उत्पादकता अभियान सुरू होणार आहे. प्रत्...

December 28, 2025 7:35 PM

views 106

आगामी वर्षात देश नवी आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

२०२५ या सरत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून, आता देश २०२६ मध्ये नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते  आज आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमातून  देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा १२९ वा भाग होता. २०२५ या वर्षाने  प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे क्षण दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.    सरत्या वर्षातलं ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं असून, आजचा भारत आपल्या सुर...