November 11, 2025 1:28 PM

views 78

भारत – भूतान यांच्यातले संबंध भविष्यातही वृद्धिंगत होतील – प्रधानमंत्री मोदी

प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. अनेक शतकांपासून भारत आणि भूतान मधले सांस्कृतिक, राजकीय संबंध अतिशय चांगले असून भविष्यातही ते वृद्धिंगत होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थिंपू इथं आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.    भूतानसाठी, भूतानच्या राजघराण्यासाठी आणि जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं.  ...

November 11, 2025 1:11 PM

views 77

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांच्या ७० वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या एक हजार २० मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांग-छू दोन या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

November 8, 2025 8:18 PM

views 70

न्यायाची भाषा नागरिकांना सहज समजण्याइतकी सोपी असावी – प्रधानमंत्री

न्यायाची भाषा ही सामान्य नागरिकांना सहज समजण्याइतकी सोपी असावी, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं. नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर मदत पोचवण्याची प्रक्रिया बळकट करण्याविषयीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. न्यायदानाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.   गेल्या तीन वर्षांत सरकारच्या सहाय्यानं लोक अदालत आणि खटला दाखल होण्यापूर्वीच मध्यस्ती करून कायदेशीर सहाय्य यंत्रणांनी आठ लाखापेक्षा जास्त प्रकरणं सोडवल्याचा उल्...

November 6, 2025 1:21 PM

views 66

विश्वविजेत्या महिला खेळाडूंनी ‘फिट इंडियाचा’ संदेश सर्वत्र पोहोचवावा – प्रधानमंत्री मोदी

विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघातल्या खेळाडूंनी ‘फिट इंडियाचा’ संदेश सर्वत्र पोहोचवावा, तसंच तंदुरुस्त राहण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री यांनी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी महिला विश्वचषक विजेत्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मोदी यांनी महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं तसंच सलग तीन पराभवानंतर देखील संघानं स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जोरदार पुनरागमन केल्याबद्दल कौतुक केलं. मोदी यांनी खेळाडूंना कठोर  परिश्रम...

November 3, 2025 9:50 AM

views 99

उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार

उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तीन दिवसांच्या या परिषदेत शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग जगत, सरकारी यंत्रणा यांच्या प्रतिनिधींसह नोबेल पुरस्कार विजेते, नामवंत शास्त्रज्ञ, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, जैव उत्पादन, नील अर्थव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादन, कृषी तंत्रज्ञान, उर्जा, पर्यावरण आणि हवामान बदल, आरोग्य तंत्रज्ञान, क्वांटम विज्ञा...

October 31, 2025 8:31 PM

views 57

क्रांतिकारकांना आर्य समाजापासून प्रेरणा मिळाली – प्रधानमंत्री

आर्य समाज ही प्रखर राष्ट्रवादींची संघटना आहे, ही संघटना निर्भयपणे भारतीयतेबद्दल बोलते. लाला लजपत राय आणि राम प्रसाद बिस्मिल यांसारख्या क्रांतिकारकांना आर्य समाजापासून प्रेरणा मिळाली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.  दिल्लीतील आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात प्रधानमंत्री बोलत होते. दुर्दैवाने, राजकीय कारणांमुळे, स्वातंत्र्यलढ्यातील आर्य समाजाच्या भूमिकेला सन्मान मिळाला नाही, असं ते म्हणाले.

October 30, 2025 8:13 PM

views 53

गुजरातमधे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १,१४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज केवडिया इथं एकता नगरमध्ये २५ ई-बसना हिरवा झेंडा दाखवला. तसंच एक हजार १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पर्यावरणपूरक पर्यटन, आदिवासी भागांचा विकास, आधुनिक पायाभूत सुविधा हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे.    प्रधानमंत्री मोदी उद्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारोहात सहभागी होतील तसंच स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष...

October 30, 2025 3:51 PM

views 159

प्रधानमंत्री २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, ते आज केवडिया येथील एकता नगरमध्ये एक हजार १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील आणि ई-बसना हिरवा झेंडा दाखवतील. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दीडशे रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे.

October 29, 2025 1:03 PM

views 76

प्रधानमंत्री येत्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आर्यन संमेलनात सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आर्यन संमेलनात सहभागी होणार आहेत. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जन्मद्विशताब्दी निमित्त तसंच आर्यसमाज स्थापनेला १५० वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त नवी दिल्लीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त आर्य समाजाचा इतिहास आणि कार्यावर आधारित एक प्रदर्शनही भरणार आहे.

October 29, 2025 1:16 PM

views 117

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री मुंबई दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते संबोधित करणार आहेत. भारत समुद्री सप्ताह २०२५ या नौवहन परिषदेत होणाऱ्या जागतिक सागरी मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षपदही ते भूषवतील.   पाच दिवसांच्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते २७ तारखेला झालं. केंद्रीय बंदरविकास, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही या परिषदेला संबो...