October 1, 2025 9:16 AM

views 95

प्रधानमंत्री मोदी RSSच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात संघाचा वारसा, सांस्कृतिक योगदान आणि देशाच्या एकात्मतेत संघाची भूमिका या गोष्टी अधोरेखित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान या प्रसंगी संघाचं देशाप्रती योगदान अधोरेखित करणाऱ्या विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशनही करणार आहेत.

September 28, 2025 7:01 PM

views 125

आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट गाठण्याकरता सणासुदीची खरेदी स्वदेशी वस्तूंची करावी – प्रधानमंत्री

आगामी सणासुदीचा काळ स्वदेशी गोष्टींचा वापर करून साजरा करण्याचा संकल्प करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सव्वीसाव्या भागात देशवासीयांशी संवाद साधला. आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे आणि या ध्येयाचा मार्ग स्वदेशीतूनच पुढे जातो असं ते म्हणाले. जीएसटी सुधारणांमुळे बचत उत्सव साजरा होत असताना व्होकल फॉर लोकल हा आपल्या सर्वांचा खरेदीचा एक मंत्र बनला पाहिजे, या संकल्पामुळे आपल्या सणांची रंगत अनेक पटीनं वाढेल असं त्यां...

September 26, 2025 7:41 PM

views 54

केंद्रसरकार अतिवृष्टीग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन

महाराष्ट्रातल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. राज्यातल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना दिली. त्यावेळी  प्रधानमंत्र्यांनी हे आश्वासन दिल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सागितलं. याशिवाय, महाराष्ट्रातले संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलत...

September 25, 2025 1:41 PM

views 51

भारताची विकास वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक पातळीवर अनेक आव्हानं आणि अनिश्चित वातावरण असूनही भारताची विकास वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तरप्रदेशात ग्रेटर नॉयडा इथं आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. आत्मनिर्भरतेचा मंत्रच भारताला तारून नेईल, असं ते म्हणाले.   सरकारच्या जेम पोर्टलवर सुमारे २५ लाख वस्तू आणि सेवा पुरवठादार विक्री करत आहेत तसंच युपीआय, आधार, डिजिलॉकर, अशा अनेक सुविधा उद्योजक आणि व्यावसायिकांना उपलब्ध आहेत.   येत्या सोमवारपर्यंत चालणाऱ्या ...

September 22, 2025 3:24 PM

views 44

अरुणाचल प्रदेशात विविध विकासप्रकल्पांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

व्हायब्रन्ट व्हीलेज उपक्रमाच्या यशामुळे सामान्य जनतेचं आयुष्य सुलभ झालं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगर इथं सुमारे ५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करण्यात आली , त्या वेळी ते बोलत होते.  अरुणाचल प्रदेशाचा विकास म्हणजे भाजपाच्या दुहेरी इंजिन सरकारमुळे मिळणाऱ्या दुहेरी लाभांचं उदाहरण आहे असंही ते म्हणाले. ईशान्येकडील राज्ये देशाच्या विकासाची प्रेरक शक्ती बनत आहेत , असं त्यांन...

September 21, 2025 7:28 PM

views 86

देशात बचत उत्सव सुरु होत असल्याचं प्रधानमंंत्र्यांचं प्रतिपादन

शारदीय नवरात्रौत्सवाबरोबरच उद्यापासून देशात बचत उत्सव सुरु होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल उद्यापासून लागू होणार आहेत, या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी आज राष्ट्राला संबोधित केलं. दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू आणि सेवांवरचा कर कमी झाल्यामुळे सर्वांचीच बचत होणार आहे असं ते म्हणाले.   प्रधानमंत्री-  १२ लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर माफ केल्यामुळे आणि जीएसटीतल्या सुधारणांमुळे मिळून करदात्यांची एकूण बचत अडीच लाख कोटी रुपयांची होईल. आ...

September 21, 2025 6:28 PM

views 72

SevaParv: शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सरकारची धोरणं

शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली. याविषयी सविस्तर जाणून घेऊया….   सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांसाठी निश्चित उत्पन्नाचे स्रोत खुले झाले. त्यांच्या जगण्यातील अस्थिरता संपली. २०१३-१४ ला शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातील वाटा २७ हजार कोटी रुपये होता. तो वाढून १ लाख ३७ हजार कोटी रुपये इतका झाला. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अकरा कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतो. किसान क...

September 21, 2025 1:43 PM

views 104

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता राष्ट्राला संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन त्यांच्या भाषणाचं थेट प्रसारण होईल.

September 17, 2025 8:43 PM

views 58

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात नवे परिमाण स्थापित केले – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात आपल्या कामातून राजनीतीचे नवे परिमाण स्थापित केल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत काढले. प्रधानमंत्री नेहमीच राष्ट्र प्रथम या दृष्टीनं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.    वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात सेवापर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका सुरू केली. यात तीन माहितीपट आणि एका विशेष कार्यक्रमाचा समावेश आहे. संकल्प की शक्ती, सुशासन का सामर्थ्य, विश्वपटल पर नेत...

September 17, 2025 8:01 PM

views 86

प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पर्यटन विभागामार्फत राज्यातला साडे सात हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ आणि पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आणि ५०० खाजगी आयटीआय मधून हजारो वि...