October 25, 2024 2:32 PM

views 37

भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असून पुढच्या २५ वर्षात हे संबंध नवी उंची गाठतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या आशियाई पॅसिफिक परिषदेलाही ते संबोधित करत होते. भारत हे वैविध्य आणि सुरक्षिततेचं केंद्र बनत असून भारत आणि जर्मनी यांच्यातले संबंध जगाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. जगाला स्थिरता, विश्वास आणि पारदर्शकतेची गरज आहे, समाज आणि पुरवठा साखळीमध्येही या मूल्यांची अत्यंत आवश्यकता आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.   &nbsp...

October 24, 2024 8:25 PM

views 74

६,७९८ कोटींच्या दोन रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं ६ हजार ७९८ कोटी रुपये किमतीच्या २ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. नरकटियागंज ते दरभंगा, सितामढी-मुझफ्फरपूर तसंच एरुपलेम-नामबुरू या दरम्यान हे रेल्वे मार्ग आहेत. यामुळं अयोध्या ते सीतामढी, काठमांडू, जनकपूर आणि लुंबिनी रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहेत. तसंच आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावतीही रेल्वेशी जोडली जाईल.    येत्या ५ वर्षात अवकाश क्षेत्रासाठी १ हजार कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल फंडालाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. याअंतर्गत वर्षाला स...

October 24, 2024 1:42 PM

views 72

प्रधानमंत्री २७ तारखेला ‘मन की बात’ कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा ११५ वा भाग आहे. श्रोते येत्या २५ तारखेपर्यंत टोल फ्री क्रमांक, नमो ॲप किंवा मायजीओव्ही ओपन फोरम वरून आपली मतं, सूचना पाठवू शकतात.

October 24, 2024 1:31 PM

views 29

रशियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्र्यांचं मायदेशी आगमन

रशियातल्या कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर काल रात्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन झालं. ब्रिक्स शिखर परिषद अतिशय फलदायी होती, असं त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत अनेक मुद्यांवर जगभरातल्या विविध नेत्यांसोबत प्रधानमंत्री मोदी यांची चर्चा झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, तिथलं सरकार आणि जनतेचे त्यांनी आभार मानले.

October 23, 2024 8:51 PM

views 61

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा

भारत आणि चीनमधले मतभेद आणि विवाद योग्यरित्या हाताळून शांतता बिघडू न देणं अत्यावश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केलं. कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत भारत-चीन सीमाप्रश्नावर तोडगा काढून शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी लवकरच भेटतील, असं निश्चित करण्यात आलं. भारत आणि चीन यांच्यातल्या स्थिर आणि सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंधा...

October 23, 2024 8:23 PM

views 29

ब्रिक्स देशांनी एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा – प्रधानमंत्री

ब्रिक्स देशांनी एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. तसंच या मुद्यांवर दुहेरी निष्ठेला बिलकुल जागा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रशियामधल्या कझान इथं १६व्या ब्रिक्स परिषदेच्या सत्राला ते संबोधित करत होते. युवकांमध्ये वाढता कट्टरतावाद रोखण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात झालेल्या दहशतवादविरोधी ठरावांवर ठोस काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना ...

October 22, 2024 8:08 PM

views 58

रशिया – युक्रेन युद्धावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा प्रधानमंत्र्यांकडून पुनरुच्चार

रशिया आणि युक्रेन युद्धावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठिंबा असेल. त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचीही आमची तयारी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांनी ही भूमिका मांडली. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं रशियातल्या कझान शहरात त्यांची ही भेट झाली. कझान शहराशी भारताचे जुने संबंध आहेत. इथं भारताचा दु...

October 22, 2024 2:30 PM

views 28

१६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

१६व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले असून ते थोड्या वेळापूर्वी कझानला पोहोचले. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ब्रिक्स समूहाची ही शिखर परिषद आजपासून कझान इथं सुरू होत आहे. ब्रिक्स समूहातलं परस्पर सहकार्य भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असून जागतिक महत्त्वाच्या विविध मुद्यांवर या परिषदेत चर्चा होईल असं प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्...

October 21, 2024 4:53 PM

views 46

रशियातल्या कझान इथला भारतीय समुदाय प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी उत्सुक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियातल्या कझानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इतर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.    दरम्यान, रशियातल्या कझान इथला भारतीय समुदाय, विशेषतः विद्यार्थी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.   आकाशवाणीच्या बातमीदारानं विद्यार्थिनीशी साधलेला संवाद.    [video width="848" height="478" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-con...

October 21, 2024 3:28 PM

views 24

जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदयाला आला – प्रधानमंत्री

भारत सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत असून जगाचं भविष्य घडवण्यासाठी तो पुढाकार घेत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. एका खासगी माध्यम समूहाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदयाला आला असं म्हणतानाच मोदी यांनी कोविड, जागतिक अर्थव्यवस्था, महागाई, हवामान बदल, बेरोजगारी आणि युद्ध यांसारख्या जागतिक परिस्थितीच्या भारतावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख केला.   राष्ट्रीय लोकशाही आ...