October 21, 2024 10:54 AM

views 81

वाराणसीमध्ये 6 हजार 700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या आपल्या संसदीय मतदारसंघात 6 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची काल पायाभरणी आणि उद्घाटन केले. शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, आरोग्यसेवा आणि पर्यटन यासह इतर क्षेत्रांशी संबंधित या विकास प्रकल्पांमुळं वाराणसीतल्या लोकांचं जीवनमान सुधारेल तसंच तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.सारनाथमधील बौद्ध धर्माशी संबंधित क्षेत्राच्या पर्यटन विकास कामांचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी क...

October 20, 2024 8:25 PM

views 41

जनतेचा पैसा जनतेच्या, देशाच्या विकासावर प्रामाणिकपणे खर्च करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री

जनतेचा पैसा जनतेच्या, देशाच्या विकासावर खर्च व्हावा, तो प्रामाणिकपणे खर्च व्हावा, याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  म्हटलं आहे. ते आज उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथं ६ हजार ७०० कोटी रुपयांच्या २३ बहुविध विकास प्रकल्पाचं उदघाटन आणि पायाभरणी करताना बोलत होते. देशातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांनी यावेळी सांगितलं. पायाभूत सुविधांमुळे नागरिकांचं जीवन सुलभ होण्यासोबतच रोजगारनिर्मिती होते, याकडे ...

October 18, 2024 1:53 PM

views 25

  राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशाच्या प्रगतीसाठी आणि गरिबांच्या सशक्तीकरणासाठी वचनबद्ध -प्रधानमंत्री

राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीए देशाच्या प्रगतीसाठी आणि गरिबांच्या सशक्तीकरणासाठी वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. चंडीगढ इथं एनडीएच्या प्रणित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.   या बैठकीत सुशासन आणि नागरिकांना अधिक सेवासुविधा पुरवत त्यांचं राहणीमान अधिक चांगलं कसं करता येईल, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरून दिली.या बैठकीत भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजन...

October 17, 2024 1:47 PM

views 27

भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असेल -प्रधानमंत्री

भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकासाच्या मार्गावर पुढे चालत असताना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आवश्यक आहे.आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   भाषा,साहित्य,कला आणि आध्यात्मिकता हे सांस्कृतिक आधारस्तंभ देशाला वेगळी ओळख देतात,असंही ते म्हणाले.जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाताना, देशाची संस्कृती ...

October 16, 2024 8:30 PM

views 30

संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही – प्रधानमंत्री

संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही. त्यामुळेच हे कलाप्रकार सर्वांना समजू शकतात, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत भारतीय नृत्यावर आधारीत पहिल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ते बोलत होते. सहा दिवस चालणाऱ्या महोत्सवाचं आयोजन संगीत नाटक अकादमीनं केलं आहे.   युवा वर्गासाठी प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशात नृत्याचं महत्त्व सांगितलं. भारतीय संस्कृतीचा नृत्य हा अविभाज्य घटक आहे. युवा वर्गानं अशा उत्सवांत सहभागी होऊन आपल्या संस्कृतीची ज...

October 16, 2024 3:43 PM

views 40

एनएसजीच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या संरक्षणाप्रति एनएसजी जवानांचं समर्पण, धैर्य आणि निर्धार यामुळे देश त्यांना सलाम करत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. एनएसजी ज्या निष्ठेने देशाच्या संरक्षणासाठी झटते ते प्रशंसनीय आहे. असंही त्यांनी नमूद केलं आहे.

October 16, 2024 3:43 PM

views 28

सक्रिय सदस्यता अभियानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आरंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सक्रिय सदस्यता अभियानाला आरंभ केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यावेळी उपस्थित होते. भाजपाला तळागाळापर्यत नेत मजबूत करण्यासाठी आणि देशाहितासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सक्रिय योगदान मिळवणं हा या योजनेमागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. सक्रिय सदस्य होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला 50 सदस्यांची नोंदणी कार्यकर्ता म्हणून करावी लागेल. सक्रिय कार्यकर्ते मंडल समिती किंवा त्यावरच्या निवडणुका लढवू शकतील. याशिवाय त्यांना पक्षासाठी काम करण्याची अनेक...

October 16, 2024 12:02 PM

views 27

आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ आणि जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद अर्थात आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. ही परिषद भारत मंडपम इथं होत आहे. यामध्ये सहभागी उद्योगक्षेत्रातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया बाबतच्या दृष्टीकोनाची प्रशंसा केली.   “तिसऱ्या कार्यकाळामध्ये पंतप्रधानांनी इंडियन मोबाइल काँग्रेस (आयएमसी) ला नाविन्यपूर्ण आण...

October 15, 2024 8:28 PM

views 16

लोथल इथं राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या निर्मितीमुळे संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळेल – प्रधानमंत्री

गुजरातमधल्या लोथल इथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाची निर्मिती झाल्यामुळे संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात प्रधानमंत्र्यांनी पर्यटन क्षेत्रातल्या व्यावसायिकांना नवीन संधी शोधण्याचं तसंच कल्पना सुचवण्याचं आवाहनही केलं.

October 14, 2024 9:15 AM

views 27

पीएम गतीशक्ती बृहद् आराखड्यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल- प्रधानमंत्री

पीएम गतीशक्ती बृहद् आराखडा सर्व क्षेत्रात वापरला जात आहे यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं असलेल्या पीएम गतीशक्ति अनुभूती केंद्राला मोदी यांनी काल भेट दिली. पीएम गतीशक्तीची मुख्य वैशिष्ट्ये, यश आणि मुख्य टप्पे या अनुभूती केंद्रात दर्शवले आहेत.   पीएम गतीशक्ती बृहद् आराखड्याला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या उपक्रमामुळे देशभरातील प्रकल्पांचे वेगवान नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये झालेल्या प्रगतीची त्या...