November 1, 2024 9:48 AM

views 17

‘एक राष्ट्र एक नागरी संहिते’च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू – प्रधानमंत्री

  'एक राष्ट्र एक नागरी संहिता' म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या दिशेने देश वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरदार पटेल यांचं दीडशेवं जयंती वर्ष सुरु होत असून, पुढचे दोन वर्ष हा जयंतीउत्सव देशभर साजरा केला जाईल, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.   देशांत सर्वत्र लागू असलेलं आधार कार्ड, जीएसटी कर प्रणाली यांचं यश अधोरेखित करत त्यांनी, एकज...

November 1, 2024 9:41 AM

views 23

आपलं सरकार एक इंच जमीनिसाठीदेखील तडजोड करणार नाही- प्रधानमंत्र्यांचा निर्धार

गुजरातमधील कच्छ येथील खाडी भागातील लक्की नाला इथे काल प्रधानमंत्री, सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. सीमेवरील एक इंच जमीनिसाठीदेखील कोणतीही तडजोड न करणारं सरकार आज सत्तेत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.   या सरकारची धोरणं, सशस्त्र दलांच्या निश्चय आणि उद्दिष्टाशी सुसंगत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सशस्त्र दलांतील जवानांच्या दुर्दम्य इच्छाशक्तिची आणि साहसाची पंतप्रधान मोदी यांनी यावेळी प्रशंसा केली. भारतीय जवानांनी नेहमीच प्रत्येक आव्हानाला समर्थपणे त...

October 31, 2024 1:59 PM

views 51

आगामी २५ वर्षांत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्त्वाची – प्रधानमंत्री

पुढच्या २५ वर्षांत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्त्वाची असून फुटीरतावादी शक्तीपासून सावधान राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने गुजरातमधल्या केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. सरकार मागच्या दहा वर्षांपासून एक राष्ट्र या भावनेला बळकट करत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. देशासमोर अनेक आव्हानं असून यापासून देशाची एकता आणि सुरक्षा याला धोका निर्माण होत आहे असं सांगत ना...

October 29, 2024 8:22 PM

views 54

आरोग्याशी संबंधित विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन

देशातले नागरिक निरोगी असतील तर देशाच्या प्रगतीला गती मिळते, त्यामुळेच देशात आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याला आपल्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  धन्वंतरी जयंती आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्राशी संबंधित सुमारे १२ हजार ८५० कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, निदान सुविधा, परवडणारी औषधं...

October 29, 2024 1:23 PM

views 71

देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह; प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

देशभरात आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी साजरी होत आहे. आजच्या दिवशी धनाची आणि धानाची तसंच देवांचे वैद्य असलेल्या धन्वंतरींची पूजा आज केली जाते. धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान धन्वंतरींच्या कृपेमुळे सर्वांना आयुष्य, आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो अशी मी कामना करतो, असं मोदी त्यांच्या समाज माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हणाले आहेत. आज साजऱ्या होणाऱ्या आयुर्वेद दिनानिमित्तही प्रधानमंत्र्यांनी स...

October 29, 2024 1:27 PM

views 53

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ५१ हजार पेक्षा जास्त युवकांना नियुक्तीपत्राचं वाटप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या  ५१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचं वितरण केलं. तरुणांना कायमस्वरुपी नोकऱ्या देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. हा रोजगार मेळावा देशभरात ४० ठिकाणी आयोजित केला जात आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कर्मयोगी प्रारंभच्या माध्यमातून मूलभूत प्रशिक्षण घेण्याची संधी...

October 29, 2024 11:15 AM

views 42

प्रधानमंत्री १२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रारंभ करणार

प्रधानमंत्री नेरंद्र मोदी आज धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आरोग्याशी संबंधित जवळपास १२ हजार ८५० कोटी रुपयांच्या योजनांचा प्रारंभ करणार आहेत. ७० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान प्रधानमंत्री भारत जन आरोग्य योजनेत सामावून घेण्याच्या योजनेचीही ते आज सुरुवात करणार आहेत. यामुळे समाजाच्या सर्व वर्गातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होतील.   याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते आरोग्य सेवा आणखी सुधारण्यासाठी विविध आरोग्य संस्थांचं उद्...

October 28, 2024 2:54 PM

views 67

खाजगी क्षेत्रातल्या पहिल्या एरोस्पेस प्रकल्पाचं प्रधानमंत्री मोदी आणि स्पेनच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गुजरातमधे वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांच्या हस्ते आज झालं. टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील एरोस्पेस प्रकल्प आहे.  भारत आणि स्पेनदरम्यान संरक्षणक्षेत्रातले संबंध या प्रकल्पामुळे अधिक दृढ होतील त्याचप्रमाणे मेक इन इंडियालाही बळ मिळेल असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. भारत साऱ्या जगास...

October 28, 2024 9:41 AM

views 117

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुज-नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधील अमरेली इथं दूरस्थ माध्यमातून भुज-नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. सुमारे १ हजार १०० कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या मार्गाची लांबी १०१ किलोमीटर आहे. या प्रकल्पामुळे गुजरातमधील कच्छ भागात स्वस्त वाहतूक आणि आर्थिक चलनवलंन वाढण्यास मदत होणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी आकाशवाणीला सांगितलं. या विस्तृत प्रकल्पात २४ मोठे पूल, २५४ छोटे पूल, ३ उड्डाणपूल आणि ३० भूमिगत पूल बांधण्य...

October 25, 2024 8:07 PM

views 55

भारत आणि जर्मनी दरम्यान विविध क्षेत्रात सामंजस्य करार

भारत आणि जर्मनीने आज ग्रीन हायड्रोजन, तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण याबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. इंडो-जर्मन ग्रीन हायड्रोजन रोडमॅपसाठी वचनबद्ध असल्याचं दोन्ही देशांनी यावेळी सांगितलं. तसंच कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेेत्रात सहकार्यासाठी सामंजस...