December 22, 2024 6:24 PM

views 42

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुवेतच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान

येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज  कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्यासोबत  औषधनिर्माण, माहिती-तंत्रज्ञान, फिन टेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा अशा प्रमुख क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी या भेटीत दोन्ही देशांमधल्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला आणि द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. भारत आणि कुवेत यांनी द्विपक्ष...

December 22, 2024 1:54 PM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रविचंद्रन अश्विन यांना भावनिक पत्र

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. क्रिकेट आणि देशासाठी अश्विन यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले ७६५ बळी आणि कसोटीत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार या अश्विन यांच्या विक्रमावर प्रकाश टाकताना, मोदींनी त्यांच्या गोलंदाजीतील विविधता आणि प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेचे कौतुक केले. प्रधानमंत्री मोदींनी आपल्य...

December 22, 2024 1:59 PM

views 51

भारत-कुवैत संबंध मजबूत करण्यात भारतीयांचा मोठा वाटा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालपासून कुवेतच्या दौऱ्यावर आहेत. कुवेतच्या बायन पॅलेसमध्ये औपचारिक स्वागतानंतर प्रधानमंत्री आज कुवेतचे अमीर आणि राजपुत्र यांच्याशी स्वतंत्र बैठका घेणार आहेत. कुवेतच्या प्रधानमंत्र्यांशी ते शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा करतील. गेल्या ४३ वर्षांतील भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा होत आहे.    काल प्रधानमंत्र्यांनी कुवेतमध्ये 'हाला मोदी' या विशेष कार्यक्रमात भारतीय समुदाया...

December 21, 2024 8:23 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुवेत दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कुवेतला पोहोचले. कुवेतचे प्रथम उप-प्रधानमंत्री शेख फहाद युसुफ सौद अल सबाह यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. गेल्या ४३ वर्षांमधली भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. या भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात  म्हटलं आहे.    मोदी यांच्या स्वागतासाठी कुवेतमधला भारतीय समुदाय उत्साहानं विमानतळावर जमला होता. यावेळी प्रधानमंत्र्यांनी १०१ वर्ष...

December 17, 2024 1:50 PM

views 53

राजस्थानात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ४६,३०० कोटी रुपये खर्चाच्या २४ प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

गेल्या वर्षभरात राजस्थानात झालेली प्रगती ही भविष्यातल्या अनेक वर्षातल्या प्रगतीची मुहूर्तमेढ ठरली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर जयपूर इथे आयोजित एक वर्ष परिणाम उत्कर्ष या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी मोदी यांनी ४६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणीपुरवठा या क्षेत्रातल्या २४ प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं.

December 17, 2024 9:46 AM

views 54

राजस्थान सरकार स्थापनेच्या वर्षपुर्तीनिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ४६,००० कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट

राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जयपूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ४६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या उर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी या क्षेत्रातील २४ प्रकल्प पायाभरणी आणि उद्घटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काही केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पांमध्ये पूगलमध्ये २ हजार मेगावॅट क्षमतेचा सौर पार्क आणि १ हजार...

December 16, 2024 9:18 AM

views 38

उद्योगांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व राज्यांनी पुढाकार घ्यावा, प्रधानमंत्र्यांचं आवाहन

छोट्या शहरांमधे उद्योग उभारणीसाठी योग्य जागा शोधून तिथं उद्योगांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना केलं आहे. राज्यांच्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. सरकारी प्रक्रियांमध्ये सुटसुटीतपणा आणावा जेणेकरुन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही असं प्रधानमंत्र्यांनी सुचवलं. राज्यांनी लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रशासकीय कामकाजात सुधारणा करावी. लोकांना सरकारच्या विविध उक्रमांची माहिती द्यावी, असं मोदी...

December 16, 2024 1:26 PM

views 38

प्रधानमंत्री श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. दिसानायके आणि त्यांच्याबरोबरच्या मान्यवरांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत  करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु  आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. अनुरा कुमारा दिसानायके तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनघड यांची भेट घेणार आहेत. तसंच बिहारमधल्या बौद्ध गया इथंही...

December 15, 2024 7:23 PM

views 38

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २९ डिसेंबरला आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये नागरिकांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २९ डिसेंबर रोजी आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमामध्ये देशातील आणि परदेशातील लोकांशी संवाद साधणार आहेत. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा ११७ वा भाग असेल.   या कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार आणि सूचना टोल फ्री क्रमांक 1800-11-7800 वरून पाठवू शकतात. तसेच, नरेंद्र मोदी अ‍ॅप किंवा MyGovओपन फोरमद्वारे ऑनलाइनही आपले मत सामायिक करू शकतात. येत्या भागासाठीच्या सूचना या महिन्याच्या २७ तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील.

December 14, 2024 9:22 AM

views 44

प्रयागराज इथे 6 हजार 670 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

महाकुंभ 2025 हा एकता-समतेचा महायज्ञ ठरेल, देशाला मार्गदर्शन करेल आणि त्याची सर्वत्र चर्चा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 13 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे सुरू होणाऱ्या महाकुंभ-2025 चं औपचारिक उद्घाटन केल्यानंतर ते प्रयागराज संगम परिसरात एका मेळाव्यात बोलत होते. या प्रसंगी, त्यांनी सुमारे 6 हजार 670 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला, यात प्रयागराजमधल्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि अखंड संपर्क प्रस्थापित करण्यासाठी अनेक रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश...