December 29, 2024 1:55 PM

views 28

मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचा प्रधानमंत्र्यांनी केला गौरव

    भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे प्रधानमंत्री म्हणाले. जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे, याविषयीची देशो देशीची उदाहरणंही त्यांनी आजच्या मन की बात मधून श्रोत्यांसमोर मांडली. हिवाळ्याच्या मोसमात देशभरात खेळ आणि तंदुरुस्ती विषयक राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की या  स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळाचा स...

December 26, 2024 2:45 PM

views 17

साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला प्रधानमंत्र्यांचं अभिवादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांच्या दोन लहान मुलांच्या साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, लहान वयातही ते आपल्या तत्वाशी आणि आस्थेबरोबर एकनिष्ठ राहिले. त्यांचं बलिदान निष्ठा आणि वीरतेचं प्रतीक आहे.  या बाल वीरांच्या स्मृतीला देशात सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबजादे यांच्या प्रतिमेला फुलं अर्पण करून अभि...

December 26, 2024 12:49 PM

views 21

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा प्रारंभ होत आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण याकार्यक्रमात केलं जाणार आहे.

December 25, 2024 3:32 PM

views 37

देशभरातल्या अटल सुशासनभवनांच्या पायाभरणीसह विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. परंतु भाजपा सरकारसाठी सुशासन ही संकल्पना एका दिवसापुरती मर्यादित नसून तीच सरकारची खरी ओळख असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मध्य प्रदेशात खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात देशभरात एक हजार,१५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाली.त्यावेळी ते बोलत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या समृतीप्रीत्यर्थ एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय नद...

December 25, 2024 10:20 AM

views 26

विकसित भारत बनवण्यासाठी घडवण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवं – प्रधानमंत्री

2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या दिशेनं लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवा असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांसोबतच्या बैठकीत बोलत होते. 'जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या विकासाची गती कायम राखणं' या मध्यवर्ती संकल्पनेवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुभ्रमण्यम आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.  

December 24, 2024 3:11 PM

views 20

प्रधानमंत्र्यांची नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केली. केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीची तयारी म्हणून ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुभ्रमण्यम आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

December 23, 2024 1:31 PM

views 19

तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

तरूणांच्या क्षमता आणि कलागुणांचा पूरेपूर वापर करून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करत होते.  देशभरात ४५ ठिकाणी असे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालयांमध्ये ७१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्...

December 23, 2024 1:34 PM

views 11

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

देशभरात विविध सरकारी मंत्रालये आणि विभागांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केलं. यावेळी त्यांनी उमेदवारांना संबोधित केलं. हा रोजगार मेळावा देशभरात ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला.    केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भर्ती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारखी विविध...

December 23, 2024 12:15 PM

views 42

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाताळ उत्सवात सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नाताळ उत्सवात सहभागी होणार आहेत. भारतीय कॅथोलिक बिशप्स परिषदेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ख्रिस्ती समाजाचे प्रमुख नेते, चर्चचे कार्डिनल्स आणि बिशप्स यांच्याशी चर्चा करतील. कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयातील प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच  कार्यक्रम आहे.  

December 22, 2024 7:32 PM

views 39

भारत आणि कुवेतमध्ये बहुआयामी संबंध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि कुवेतमध्ये इतिहास, संस्कृती आणि परस्परांबद्दलचा आदर असे बहुआयामी संबंध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कुवेतमधल्या एका खाजगी वृत्तसंस्थेला मुलाखतीत ते बोलत होते. ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध असल्याचं ते म्हणाले. व्यापार आणि वाणिज्य या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. औषधनिर्माण, आरोग्य, तंत्रज्ञान, डिजिटल, नवोन्मेष आणि वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्...