December 13, 2024 7:06 PM

views 72

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. यावेळी प्रधानमंत्र्यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी समाज माध्यमांवर दिली.

December 13, 2024 3:21 PM

views 54

महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ७ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण

प्रयागराजच्या भूमीवर एक इतिहास रचला जात असून महाकुंभ मेळ्याच्या  आयोजनामुळे  देशाची  सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.    प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होणार असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ७ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.    भारत हा तीर्थक्षेत्रांचा आणि पवित्र नद्यांचा देश आहे. या नद्यांचं माहात्म्य, त्यांचा संगम म्हणजे ...

December 12, 2024 7:16 PM

views 60

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी फडनवीस यांनी प्रधानमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती भेट म्हणून दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य असल्याचं सांगत, राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं असल्याचं फडनवीस यावेळी म्हणाले.   या दोन दिवसीय दौऱ्या दरम्यान ...

December 12, 2024 8:55 AM

views 25

युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही देशाची खरी ताकद, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारताचं सामर्थ्य आमची युवा शक्ती आहे. आणि युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही आमची खरी ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीतील तेराशे विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. देशभरातल्या 51 केंद्रांवर या स्पर्धा सुरू आहेत. देशातले युवक विविध समस्यांवर उपाय शोधून तोडगा काढत सरकारला साथ देत असून यामुळं भारत विकसित होण्याच्या मार्गावर आहे याचा विश्वास वाटतो असं प्रधानमंत्री म्हणाले. हॅकेथॉनच्या काल सुर...

December 11, 2024 1:20 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना गीताजयंतीच्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना गीताजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांना मार्गदर्शन करणाऱ्या शास्त्राचा निर्मिती दिवस म्हणून  आजचा पवित्र  दिवस साजरा केला जातो, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी भगवान कृष्णाचं स्मरण केलं आणि भगवद गीता सर्वांना कर्मयोगाचा मार्ग दाखवेल अशी आशा व्यक्त केली.

December 11, 2024 10:57 AM

views 38

कर्णबधीरांच्या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय चमुचं प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालंपूर इथे झालेल्या १०व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स २०२४ मध्ये, अर्थात कर्णबधीरांच्या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय चमुचं अभिनंदन केलं आहे. 55 पदकं जिंकून देशासाठी अभिमानस्पद काम करणाऱ्या या प्रतिभावान खेळाडूंचं मोदी यांनी कौतुक केलं. या खेळांमधील भारताची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. संपूर्ण देशाला, विशेषत: खेळाची आवड असलेल्यांना या पराक्रमामुळे प्रेरणा मिळल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

December 10, 2024 10:36 AM

views 40

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी युवा पिढीशी प्रधानमंत्री उद्या संवाद साधणार

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी होत असलेल्या युवा पिढीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ माध्यमातून संवाद साधणार आहेत. या स्पर्धेत १३०० हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. मुंबई पुण्यासाह देशातल्या ५१ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. पुण्याच्या एमआयटी विद्यापीठामध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर गटाची अंतिम फेरी होणार आहे.

December 10, 2024 9:30 AM

views 34

नोईडा आंतररराष्ट्रीय विमानतळामुळे दळणवळण वाढेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नोईडा आंतररराष्ट्रीय विमानतळामुळे दळणवळण वाढेल आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे एनसीआर क्षेत्र आणि उत्तर प्रदेशातल्या लोकांचं जीवनमान सुकर होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपलं सरकार जनतेला उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी अनेक पाऊलं उचलत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.   नोईडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सध्या सुरू आहे. विमान धावपट्टीवर उतरण्याची पहिली चाचणी काल यशस्वी झाली. दिल्लीहून आलेलं विमान दुपारी धावपट्टीवर उतरलं. पाच...

December 9, 2024 1:23 PM

views 17

तरुणांच्या कौशल्य विकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारतात येणाऱ्या काळात तरुणांची संख्या सर्वात जास्त असणार असून या तरूणांच्या कौशल्यविकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमध्ये जयपूर इथं होत असलेल्या रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते संबोधित करत होते. सध्या भारत तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या साहाय्यानं लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि डेटा पॉवर या क्षेत्रांंमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तसंच गेल्या दहा वर्षात भारत जगातली पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली असून भारताच्या ...

December 6, 2024 8:17 PM

views 24

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन

ईशान्य भारतातल्या आठ राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा अष्टलक्ष्मी महोत्सव हा ईशान्य भारतातील उत्पादन आणि सेवा देश आणि जगासमोर प्रदर्शित करण्याचा पहिला मोठा प्रयत्न आहे. जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी इथे मोठ्या संधी उपलब्ध होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातल्या राज्यांमधला हिंसाचार कमी होत असून पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भावी ...