April 6, 2025 2:50 PM

views 25

प्रधानमंत्री तामिळनाडूमधल्या नव्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमधल्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत. ५५० कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल उच्च दर्जाचे संरक्षक रंग आणि पूर्णपणे वेल्डेड जॉइंट्स वापरून बांधण्यात आला आहे.यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ८३०० कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. मोदी रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील त्याचबरोबर रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शन घेतील.

April 3, 2025 3:24 PM

views 77

प्रधानमंत्री थायलंडमधल्या बँकॉक इथे पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथे पोहोचले. विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुआनग्रुआंकित यांनी मोदी यांचं स्वागत केलं. थायलंडमधला भारतीय समुदायही प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आला होता. त्यानंतर मोदी यांच्या स्वागतार्थ भरतनाट्यम आणि थायलंडच्या शास्त्रीय नृत्यशैलीचा मिलाफ दाखवणारा कार्यक्रम सादर करण्यात आला.     या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी थायलंडच्या प्रधानमंत्री पेतोंगटार्न शिनावात्र...

March 30, 2025 2:13 PM

views 53

प्रधानमंत्र्यांचा ‘मन की बात’मधून श्रोत्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे विसावा भाग होता. आपल्या सणांतून दिसणारी एकतेची भावना आपल्याला सतत्यानं बळकट करायची आहे असं आवाहन त्यांनी केलं.  महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह, देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणार असलेल्या रोंगाली बिहू, पोईला बोइशाख, नवरेह सणाच्या, तसंच ईदच्याही शुभेच्छा त्यांनी दिल्या.    यानिमित्तानं प्रधानमंत्र्यांनी त्यांना विविध भाषांमध्...

March 30, 2025 1:58 PM

views 60

नागपुरात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर इथल्या माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन झालं. नागपुरात माधव नेत्रालय गोळवलकर गुरूजी यांच्या आदर्शानुसार लाखो लोकांची सेवा करत असून नागपुरात आज आपण एका पुण्यसंकल्पाचे साक्षीदार बनत आहोत, असं यावेळी ते म्हणाले. देशवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं ही आपली प्राथमिकता आहे, आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे नागरिकांना मोफत उपचार दिले जात आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.    वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे, मेडिकलच्या जागा...

March 28, 2025 6:10 PM

views 34

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० मार्चला महाराष्ट्र आणि छत्तीसगढ दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगढला भेट देणार आहेत. नागपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने ते स्मृतिमंदिर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील. ते दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर ते  माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन करतील आणि एका कार्यक्रमाला संबोधित करतील. याशिवाय इतरही प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री छत्तीसगढला जातील. बिलासपूर इथं ३३ हजार ७०० कोटी रुपये खर्चाच्या विविध व...

March 27, 2025 8:45 PM

views 61

प्रधानमंत्र्यांचं नागपुरात भव्य स्वागत करण्याच्या सूचना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी ३० मार्च रोजी नागपुरात येत आहेत. त्यावेळी त्यांचं भव्यदिव्य स्वागत करा, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. प्रधानमंत्र्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक शहरातल्या महाल भागात झाली, तिला बावनकुळे यांनी संबोधित केलं.

March 23, 2025 12:46 PM

views 24

प्रधानमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांना श्रद्धांजली

सामाजिक न्यायाचे खंदे समर्थक आणि महान स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांची आज जयंती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोहिया यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. लोहिया हे एक दूरदर्शी नेता होते. वंचितांना सबल करण्यासाठी आणि सक्षम भारताच्या निर्माणासाठी लोहिया यांनी आपलं जीवन समर्पित केलं, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये लिहिलं आहे.

March 21, 2025 9:22 AM

views 66

विकसित भारतासाठी गावांचा विकास आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्याचं प्रतिपादन

विकसित भारताच्या निर्मितीच्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणून गावांचा विकास करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. गुजरातच्या भारवाड समाजाशी संबंधित बावलियाली धाम इथं झालेल्या कार्यक्रमात ते दूरस्थ माध्यमातून बोलत होते.   ग्राम विकासासाठी सामूहिक प्रयत्नांचं महत्त्व अधोरेखित करताना, 'सबका प्रयास' ही देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले. समाजाचं सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षणाचं महत्व या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. आगामी पिढीने शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनून सुदृढ समाजासा...

March 18, 2025 8:24 PM

views 49

देशाच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभाची नोंद होईल – प्रधानमंत्री

देशाच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभाची नोंद होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. लहानसहान सोयी सुविधांची पर्वा न करता कोट्यावधी भाविक या महामेळाव्यात सहभागी झाले होते असं ते म्हणाले. अशा उत्सवांमुळे आपल्या परंपरा, आणि वारशाचं भव्य दर्शन जगाला मिळालं असं त्यांनी सांगितलं.   प्रयागराज इथल्या संगमातलं पाणी मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना आपण तिथल्या गंगा तलावात अर्पण केलं याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला. महाकुंभापासून प्रेरणा घेऊन देशभरात नदी उ...

March 17, 2025 8:25 PM

views 32

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ख्रिस्तोफर लक्झन यांच्या हस्ते रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन

भारत आणि न्युझीलंडच्या आर्थिक प्रगतिकरता दोन्ही देशांनी एकमेकांशी तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करणं गरजेचं असल्याचं मत न्यू झिलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्सन यांनी केलं आहे. रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ख्रिस्तोफर लक्झन यांच्या हस्ते झालं. त्यानंतर ते बोलत होते.गेल्या २०० वर्षांपासून भारत आणि न्युझीलंडचे नागरिक उद्योग आणि संस्कृतीची आदान प्रदान करत आहेत, आणि आजही विविध क्षेत्रात सहकार्य वृद्धीसाठी दोन्ही देश कार्यरत असल्याचं लक्झन यावेळी म्हणाले. औषध...