March 16, 2025 7:47 PM

views 31

शांततेविषयी भारत बोलतो तेव्हा जग ऐकतं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 भारत हा उदासीन नाही, तर शांततेसाठी ठामपणे वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. एआय संशोधक आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.   भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे, त्यामुळे भारत जेव्हा शांततेविषयी बोलतो तेव्हा जग ऐकतं, भारतीय नेहमी सद्भावना आणि शांततेसाठी ठाम भूमिका घेतात, असंही ते यावेळी म्हणाले. या मुलाखती दरम्यान मोदी यांनी यूक्रेन आणि रशिया संघर्षावरच्या प्रश्नालाही उत्तर दिलं. दोन्ही देश जेव्हा वाटाघाटी करण्या...

March 16, 2025 3:24 PM

views 46

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं RBIचं कौतुक

ब्रिटनमधल्या सेंट्रल बँकिंग, लंडननं डिजिटल ट्रान्सफॉर्मशन अवॉर्ड २०२५ साठी रिझर्व्ह बँकेची निवड केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बँकेचं अभिनंदन केलं आहे. या निवडीतून  बँकेची नाविन्यता आणि प्रशासनातील  कार्यक्षमता प्रतिबिंबित होते, असं त्यांनी म्हटलं आहे. डिजिटल नवोन्मेषमुळे भारतातील वित्तीय परिसंस्था आणि अनेकांचं आयुष्य बळकट व्हायला मदत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

March 16, 2025 6:29 PM

views 30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन करणार आहेत. या संवादाचं हे दहावं वर्ष आहे. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झन हे या संवादाच्या उद्घाटनाच्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि उपस्थितांशी संवाद साधतील. उद्यापासून १९ तारखेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. यंदा रायसीना संवादाची मध्यवर्ती संकल्पना ‘कालचक्र - नागरिक, शांतता आणि पृथ्वी’ अशी आहे. यंदा या कार्यक्रमात १२५ देशांमधून विविध क्षेत्रांमधले आघाडीचे नागरिक सहभागी होणार आहेत. यासाठी वि...

March 15, 2025 2:42 PM

views 61

प्रधानमंत्री मोदी ३० मार्चला ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा १२० वा भाग असेल.   नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या २८ मार्च पर्यंत १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, तसंच प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनल वरून मन-की-बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असून त्यानंतर लगेचच ...

March 13, 2025 10:20 AM

views 37

मॉरिशस दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतले

भारत आणि मॉरिशसदरम्यान सागरी सुरक्षा आणि स्थानिक चलनात व्यापारवृद्धीसह आठ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलम यांच्यात पोर्ट लुईसमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान, मॉरिशसच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्र्याचं आज सकाळी नवी दिल्लीत आगमन झालं आहे.   काल झालेल्या चर्चेनंतर प्रधानमंत्री मोदी यांनी विकसनशील देशांबाबत विविध विभागांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी सहमतीनं आणि सर्वसमाव...

March 12, 2025 8:03 PM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखूल यांनी त्यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन’ या कार्यक्रमात प्रदान केला. भारत - मॉरिशस संबंधात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं. हा सन्मान मिळवणारे प्रधानमंत्री मोदी हे पहिले भारतीय आहेत.   मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन रामगुलाम यांच्यासोबत त्यांनी आज प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. यावे...

March 11, 2025 1:49 PM

views 25

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मॉरिशस दौऱ्यावर

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज सकाळी पोर्ट लुईस इथं पोहोचले. मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम यांनी विमान तळावर त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी तिथला भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता.   मॉरिशस हा भारताचा हिंद - महासागर क्षेत्रातला महत्त्वाचा शेजारी देश असून, त्याच्याबरोबर विविध क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी तसंच हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा आणि विकासासाठी मॉरीशसच्या नेत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचं...

March 10, 2025 9:34 AM

views 43

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळवारपासून मॉरिशस दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मंगळवारपासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर जाणार आहेत. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री तिथल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये सिव्हिल सर्व्हिस कॉलेज आणि विभागीय आरोग्य केंद्राचा समावेश आहे. हे प्रकल्प भारताच्या मदतीनं उभारण्यात आले आहेत.   भारत आणि मॉरिशस यांच्यात मजबूत, गतिशील आणि द्विपक्षीय संबंध आहे...

March 8, 2025 9:14 PM

views 79

प्रधानमंत्री येत्या ११ तारखेपासून मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार

भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार व्यापार करारावर चर्चा पुढे नेण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. गेल्या महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळीच दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य, बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्याविषयी जाहीर करण्यात आलं होतं. या चर्चेचा उद्देश व्यापार मजबूत करणं, बाजारपेठेत आणखी संधी उपलब्ध करून देणं तसंच करांसारख्या शुल्कांच...

March 7, 2025 12:55 PM

views 31

प्रधानमंत्री दोन दिवसांच्या गुजरात, दीव, दमण दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात, दादरा नगर हवेली आणि दीव दमणच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी सुरत, नवसारी आणि दमणमधल्या सिल्वासा इथं विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी दोन वाजता दादरा, नगर हवेली आणि दमण इथं २ हजार ५८७ कोटी मूल्यांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तसंच सिल्वासा इथं जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर सुरतमध्ये सुरत अन्न सुरक्षा आणि परिपूर्णता मोहिमेचा शुभारंभ करतील. सुरतमधील दोन लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री ग...