April 24, 2025 11:44 AM

views 63

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये विकास कामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारला भेट देणार असून, मधुबनी इथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. या प्रसंगी, 13 हजार 480 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानच्या हस्ते होणार असून, रेल्वे आणि वीज क्षेत्रातील काही प्रकल्पाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यात, जयनगर ते पाटणा दरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिड रेल्वे आणि सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला दू...

April 23, 2025 10:51 AM

views 42

भारत-सौदी अरेबिया यांच्यात चार सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बीन सलमान यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी सुरक्षा, ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, संस्कृती आदि मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी चार महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात अंतराळ संशोधन, आरोग्य आणि डोपिंग विरोधी क्षेत्राचा समावेश आहे. सौदी अरेबियाने भारतात ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यामधे स्वारस्य दाखवलं आहे.

April 23, 2025 10:39 AM

views 64

प्रधानमंत्री मायदेशी परतले, विमानताळवरच केली संबंधितांशी चर्चा

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतात परतले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी विमानतळावरच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.   प्रधानमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्याच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल. दहशतवाद्यांचे दुष्ट मनसुबे कधीच सफल होणार नाहीत, असं...

April 22, 2025 9:06 PM

views 46

प्रधानमंत्री आणि सौदी अरेबियाचे प्रधानमंत्री यांच्यात द्विपक्षीय चर्चा

सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जेद्दाह इथं पोचले. सौदी अरेबियाचे युवराज आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान यांच्यासह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या धोरणात्मक भागीदारी परिषदेची बैठक सध्या सुरु आहे.   विशेष सन्मान म्हणून, सौदी हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यापासून सौदीच्या शाही वायूदलातल्या एफ-१५ लढाऊ जेट विमानांनी मोदी यांच्या विमानाची सोबत केली. विमानतळावर २१ तोफांची सलामी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. तिथल्या भारतीय समुदायानं साद...

April 17, 2025 7:57 PM

views 27

यमुना नदीबाबत आखलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक

यमुना नदीत सोडलं जाणाऱ्या सांडपाण्याचं प्रमाण आणि ते सोडण्याच्या आधी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जात आहे कि नाही याची प्रत्यक्ष तपासणी आवश्यक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यमुना नदीची सद्यपरिस्थिती आणि तिच्या पुनरुज्जीवनासाठी आखलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठीची बैठक आज नवी दिल्लीत मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.

April 14, 2025 9:49 AM

views 32

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हरियाणातल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणामधल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. प्रधानमंत्री हिसार ते अयोध्या या व्यावसायिक विमान उड्डाणा सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. तर यमुनानगरमध्ये, 800 मेगावॅट वीज युनिट क्षमतेच्या दीनबंधू छोटू राम औष्णिक वीज प्रकल्पाचं, तसंच मुकरबपूरमधला कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प आणि भारतमाला प्रकल्पांतर्गत 14 किमीपेक्षा जास्त लांबीच्या रेवाडी बायपास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पाया...

April 13, 2025 1:14 PM

views 61

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाला भेट देणार आहेत. सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. हिसार इथं ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर, यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज केंद्राच्या 800 मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज प्रकल्पाची ते पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे हरियाणात गावोगावी अखंडित वीजपुरवठा करण्याच्या कामाला चालना मिळणार आहे.  भारतमाला परियोजनेअंतर्गत सु...

April 12, 2025 9:37 AM

views 28

अद्वैत तत्वज्ञानामध्येच राष्ट्रांतर्गत संघर्ष आणि मानवी मूल्यांशी निगडीत आव्हानांवर उपाय- प्रधानमंत्री

जग भौतिक प्रगती करतानाच युद्ध, राष्ट्रांतर्गत संघर्ष आणि मानवी मूल्यांशी निगडीत विविध आव्हानांना तोंड देत आहोत, या आव्हांनावरील उपाय हे अद्वैत तत्वज्ञानातूनच मिळणार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी काल केलं. मध्य प्रदेशातल्या अशोकनगर इथल्या इसागढ इथं श्री आनंदपूर धाम इथं भाविकांना ते संबोधित करत होते. यावेळी मोदींनी परमहंस अद्वैत पंथाच्या मंदिरांना भेट दिली तसंच प्रमुख आध्यात्मिक नेत्याची भेट घेतली. सत्संग कार्यक्रमातही सहभागी झाले होते.   यावेळी बोलताना, गरीब आणि वंचितांची प्रगती...

April 7, 2025 1:48 PM

views 33

प्रधानमंत्री २७ एप्रिलला ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिल रोजी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरुन देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२१वा भाग असेल. कार्यक्रमाकरता आपल्या सूचना किंवा प्रश्न १८०० – ११ – ७८०० या टोलफ्री क्रमांकावर नोंदवता येतील. नरेंद्र मोदी ॲप किंवा मायगोव्ह ओपन फोरम द्वारे देखील सूचना नोंदवता येतील. येत्या २५ तारखेपर्यंत येणाऱ्या सूचनांचा विचार करण्यात येईल.

April 6, 2025 3:28 PM

views 37

भारतानं अर्थव्यवस्था दुप्पटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या दहावर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तमीळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पीय तरतुद सहा पटीनं वाढवल्याचं त्यांनी सांगितलं. देशात पायाभूत सुविधांचं वेगानं काम होत असल्याचं ते म्हणाले, यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर मुंबईती...