May 8, 2025 6:53 PM

views 54

राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विभाग आणि मंत्रालयाच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक झाली. मंत्रालयाचे विविध विभाग आणि सुरक्षा यंत्रणांमधे समन्वयाची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त  केली.  देशातल्या  सद्याच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचाही त्यांनी आढावा  घेतला. या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली. संरक्षण यंत्रणा मजबूत करणं, अफवांना रोखणं आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणं या मुद्यांचा यात समावेश ...

May 1, 2025 10:38 AM

views 39

वेव्हज परिषदेसाठी मुंबई सज्ज, प्रधानमंत्री करणार उद्घाटन

पहिल्यावहिल्या वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन परिषद २०२५ चं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश, माध्यमं, मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातली भारताची प्रतिभा अधोरेखित करणं, तरुणांसाठी नवनिर्मितीच्या अभिनव संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना व्यासपीठ देणं, असा आहे.   वेव्ह्ज २०२५ साठी स्वप्ननगरी मुंबई सज्ज झाली आहे. १५ हजार वर्ग मीटर परिसरात पसरलेल्या या भव्य परिषदेत माध्...

April 29, 2025 1:18 PM

views 30

शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठीच्या युग्म परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 विकसित भारताच्या तंंत्रज्ञानातल्या भविष्याशी संबधित सर्व भागीदार युग्म या परिषदेत एकत्र आले आहेत. असं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेली प्रगती नमूद केली. युग्म या धोरणात्मक परिषदेला आज दिल्लीत भारत मंडपम इथं सुरुवात झाली.  त्या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संबोधित केलं.  भारताची संशोधन क्षमता आणि डीप टेकमध्ये भारताची क्षमता वाढवण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याला या परिषदेच्या आयोजनातून बळ मिळेल असं ते म्हणाले. परिषदेच्या माध्यमातून आयआयटी कान...

April 28, 2025 8:50 PM

views 51

वेव्हज २०२५ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबईत येत्या १ मे पासून ४ मे पर्यंत आयोजित वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन १ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधले परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. हिंदी, मराठी, तामीळ चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार आणि निर्माते कार्यक्रमात सहभ...

April 27, 2025 1:40 PM

views 36

दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली ‘एकी’ हीच सर्वात मोठी ताकद – प्रधानमंत्री

दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून सांगितलं. हा या कार्यक्रमाचा एकशे एकविसावा भाग होता.    सुरुवातीलाच प्रधानमंत्र्यांनी पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं आपलं मन व्यथित झाल्याची भावना व्यक्त केली. या हल्ल्यामुळे देशातला प्रत्येक नागरिक दुःखी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना, शाळा-महाविद्यालयांमध्ये चैतन्य निर्माण होत असताना आणि पर्यटकांची ...

April 26, 2025 3:03 PM

views 50

देशातले तरुण कठोर परिश्रमातून राष्ट्राची सक्षमता जगाला दाखवत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त ५१ हजारांहून अधिक तरुणांना दूरस्थ पद्धतीनं आज मोदी यांनी नियुक्ती पत्रं वाटली, त्यानंतर ते बोलत होते.   अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्याचं उद्दिष्ट ‘मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं, देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी दे...

April 24, 2025 7:57 PM

views 42

इंडिया स्टील २०२५च्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारतातल्या पोलाद उद्योगात शून्य आयात करून फक्त निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या इंडिया स्टील २०२५च्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीने केल्यानंतर ते बोलत होते. राष्ट्रीय पोलाद धोरणांतर्गत निर्धारित केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. येत्या २०३० पर्यंत देशातलं पोलाद उत्पादन ३० कोटी टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्यांचही ते यावेळी म्ह...

April 24, 2025 1:37 PM

views 25

पाकिस्तान विरोधात भारताची कठोर पावलं

जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर  भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण सल्लागारांना आठवडाभरात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर, भारताने इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार परत बोलवण्याची घोषणा केली आहे.   भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेला, 1960 चा सिंधू पाणी करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. वाघा-अटारी सीमा बंद करण्यात आली असून, सार्क व्हिसा सवलत योजना पाकिस्तानी नागरिकांसाठी रद्द करण्...

April 24, 2025 2:06 PM

views 47

बिहारमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन

देशाचा विकास गावखेड्यांच्या विकासातून साकार होतो, या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर पंचायती राज योजना राबवण्यात येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमध्ये मधुबनी इथे पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.   गेल्या दशकात पंचायतींना बळकट करण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. २ लाखांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या त्यामुळे अनेक आवश्यक कागदपत्रं मिळणं सुलभ झालं. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनंतर ३० हजार नवीन पंचायत भवन ...

April 24, 2025 1:27 PM

views 15

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘इंडिया स्टील २०२५’ चं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया स्टील 2025 या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्टील प्रदर्शनाचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन होणार आहे. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद  मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन, भविष्यातील वाटचालीवर चर्चा करणार आहेत.  या परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छत्तीसगड आणि ओडिशाचे मुख्यमंत्री सहभागी होण्याची अपेक्षा आहे.