May 23, 2025 3:16 PM

views 17

विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  ईशान्येकडच्या राज्यांमधे गुंतवणुकीच्या संधी उलगडून दाखवणाऱ्या  उदयोन्मुख ईशान्य भारत गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या  हस्ते  झालं. त्यावेळी ते बोलत होते. ईशान्येकडच्या राज्यांमधे निसर्गाचं जतन आणि संवर्धन लोकपरंपरेनं केलं असून तिथलं आरोग्यदायी वातावरण गुंतवणुकदारांसाठी एक आकर्षण असल्याचं ते म्हणाले. ईशान्येकडच्या राज्यांमधे पायाभूत सोयीसुविधांचा विकास झाला असल्य...

May 22, 2025 1:22 PM

views 30

प्रधानमंत्र्याच्या हस्ते १०३ पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थानमधील बिकानेर इथं अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. रेल्वे, रस्ते, उर्जा, पाणी आणि नवीन तसंच नवीकरणीय उर्जा क्षेत्रातले हे प्रकल्प आहेत. याच कार्यक्रमात प्रधानमंत्री 103 पुनर्विकसित अमृत भारत स्थानकांचंही उद्घाटन करणार आहेत. 18 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 86 जिल्ह्यांतल्या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.   स्थानिक कला, संस्कृती, परंपरांचं दर्शन घडवण्याच्या दृष्टीने या रेल्वेस्थानकांचं सुशोभीकरण करण्...

May 21, 2025 1:32 PM

views 14

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन होणार

अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत १८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या करणार आहेत. या रेल्वेस्थानकांवर अद्ययावत प्रतीक्षालय, शौचालय आणि निवाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय विविध सुविधा या रेल्वेस्थानकांवर देण्यात आल्या आहेत.

May 21, 2025 1:29 PM

views 29

प्रधानमंत्र्याची जर्मनीचे नवनियुक्त चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक तसंच जागतिक घडामोडींबाबत काल जर्मनीचे नवनियुक्त चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. जर्मनीसह भारत दहशतवादाविरुद्ध ठामपणे उभा राहील,  भारत-जर्मनी दरम्यानच्या रणनीतीविषयक भागीदारीत आणखी भर घालण्यासाठी भारत वचनबद्ध राहील, असं आश्वासन मोदी यांनी यावेळी  मर्झ यांना दिलं. प्रधानमंत्र्यांनी मर्झ यांना भारतभेटीवर येण्याचं निमंत्रणही दिलं आहे.

May 15, 2025 8:01 PM

views 18

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकटीसाठी अनेक उपाययोजना – प्रधानमंत्री

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीनं सरकारनं अनेक उपाय योजले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या प्रगतीचा आणि भविष्यातल्या उपायांचा आढावा घेणाऱ्या बैठकीत बोलत होते. अति खोल समुद्रातली  मासेमारी आणि सागरी खाद्यान्नाची निर्यात या मुद्द्यांवर या बैठकीत विशेष चर्चा झाली. मच्छीमारांना अधिक पतपुरवठा व्हावा तसंच बाजारपेठेपर्यंत सुलभपणे पोहोचता यावं, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री  म्हणाले. 

May 13, 2025 1:20 PM

views 36

ऑरपेशन सिंदूर स्थगित, मात्र दहशतवादाशी लढा सुरूच राहील – प्रधानमंत्री

भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' स्थगित केलं आहे; ते थांबवलेलं नाही, दहशातवादाविरुद्धची लढाई चालूच राहील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. दहशतवादाला खतपाणी घालणारं सरकार आणि दहशतवादी संघटना वेगवेगळ्या नसून पाकिस्तानच्या हालचालींवर  भारताचं लक्ष आहे असं त्यांनी सांगितलं.   पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं; त्यानंतर प्रथमच प्रधानमंत्र्यांनी काल राष्ट्राला संबोधित केलं. एकीकडे प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षिततेबाबत आश्वस्त करतानाच त्यांनी ...

May 13, 2025 2:59 PM

views 29

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हवाईदल जवानांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधे आदमपूर इथं हवाईदलाच्या तळाला भेट दिली आणि तिथं हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधला. सेनादलांच्या जवानांबद्दल देशाला कृतज्ञता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आणि जवानांचं मनोबल वाढवलं. तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना सद्यस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली. आदमपूर हवाई तळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार असून त्याचं थेट प्रसारण आज दुपारी साडेतीन वाजता आकाशवाणीवरुन होणार आहे.

May 13, 2025 10:57 AM

views 45

पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवादावरच, प्रधानमंत्र्यांची स्पष्टोक्ती

पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त दहशतवादावरच होईल, पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होईल आणि हेच आमचं स्पष्ट धोरण आहे, असा परखड इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दिला. 'पाकिस्तानला टिकून राहायचं असेल तर त्यांना दहशतवादाची पाळंमुळं नष्ट करावीच लागतील; दहशतवाद आणि चर्चा एकत्र होणार नाही, दहशतवाद आणि व्यापार एकत्र सुरू राहणार नाही. पाणी आणि रक्त देखील एकत्र वाहू शकत नाही', असा सज्जड इशारा प्रधानमंत्री मोदी यांनी दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाक...

May 11, 2025 3:09 PM

views 52

पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी केल्यानंतर प्रधानमंत्र्यांची महत्त्वाची बैठक

पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच तिन्ही सेनादलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. युद्ध विरामाच्या घोषणेनंतर प्रधानमंत्र्यांनी काल घेतलेल्या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर सुब्रह्मण्यम जयशंकर, संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. भारतानं पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरु ...

May 10, 2025 9:34 AM

views 22

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल एक उच्चस्तरीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सरसेनाध्यक्ष आणि तीनही सशस्त्र दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर पंतप्रधानांनी काल माजी लष्करप्रमुख, माजी हवाईदल आणि नौदल प्रमुख तसंच सैन्य दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली.