July 8, 2025 1:36 PM

views 82

अमेरिकेच्या आयातशुल्क अंमलबजावणीला मुदतवाढ

अमेरिकेकडून नऊ जुलैपासून लागू करण्यात येणाऱ्या आयातशुल्क अंमलबजावणीला आता एक ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे जगभरातील अनेक देशांना दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी समाज माध्यमाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ देशांवरील नवीन आयातशुल्काची रूपरेषा जाहीर करण्यात आली असून, ते एक ऑगस्टपासून लागू होतील. दोन एप्रिल रोजी भारतासह अनेक देशांना आयातशुल्क लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता, परंतु नंतर त्यांची अंमलबजावणी ९० दिवसांसाठी थांबवण्यात आली,...

July 7, 2025 2:52 PM

views 75

ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जुळणाऱ्या देशांवर अमेरिकेचा १० % अतिरिक्त कर

ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जुळणाऱ्या देशांवर आपलं प्रशासन अतिरिक्त दहा टक्के कर लादेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. या धोरणाला कोणतेही अपवाद असणार नाहीत, असं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा समूह असलेल्या ब्रिक्सनं अमेरिकेने केलेल्या कर वाढीचा निषेध केल्यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे.

July 4, 2025 12:10 PM

views 76

अमेरिकन काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सादर केलेलं कर आणि खर्च विधेयक केलं मंजूर

अमेरिकन काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सादर केलेलं कर आणि खर्च विधेयक मंजूर केलं आहे. काल रात्री झालेल्या सत्रात प्रतिनिधी सभागृहाने 218 विरुद्ध 214 अशा मतांनी हे विधेयक मंजूर केलं. यामुळे काही प्रमाणात कर कमी होतील, लष्करावरील खर्च वाढेल आणि मेडिकेड, एसएनएपी आणि स्वच्छ ऊर्जा निधीमध्ये मोठी कपात होईल.  

June 24, 2025 12:56 PM

views 63

हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला तात्पुरता आदेश जारी

अमेरिकेतल्या बोस्टन इथले जिल्हा न्यायाधीश ॲलिसन बरोज यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला दुसरा तात्पुरता आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परदेशी विद्यार्थ्यांना, यासंदर्भातला कायदेशीर खटला सुरू असेपर्यंत हार्वर्डमध्ये शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. या आदेशानं हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापासून रोखण्याचा ट्रम्प प्रशासनाचा आणखी एक प्रयत्न रोखला गेला आहे.

June 22, 2025 1:25 PM

views 55

इराणच्या ३ अणुप्रकल्पांवर अमेरिकेचा हल्ला

इराण-इस्रायल संघर्षात आता अमेरिकेनं जाहीररीत्या उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला केला असून, हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेची सर्व विमानं इराणी हवाई हद्दीबाहेर आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमध्यमावरील संदेशातून जाहीर केलं आहे. इतर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्यानं अमेरिकेने नाईलाजास्तव ही कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर इराणने आता शांतता प्रस्थापित करावी असं आवाहनही ट्रंप यांनी केलं आहे.

June 6, 2025 8:34 PM

views 45

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या, हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यापासून परदेशी विद्यार्थ्यांना थांबवण्याच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या, हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यापासून परदेशी विद्यार्थ्यांना थांबवण्याच्या आदेशाला अमेरिकेतल्या बोस्टन इथल्या न्यायालयानं आज तात्पुरती स्थगिती दिली. ट्रम्प यांचा हा निर्णय बेकायदा असल्याचं सांगून या निर्णयाविरोधात हार्वर्ड विद्यापीठानं न्यायालयात धाव घेतली होती.  

May 12, 2025 2:31 PM

views 45

 अमेरिकेत औषधांच्या किमती ३० ते ८० टक्क्यांनी कमी करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

 अमेरिकेत औषधांच्या किमती ३० ते ८० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत औषधांच्या किंमती अधिक आहेत. औषधनिर्मितीसाठीचं  संशोधन आणि विकास खर्चामुळे  किमती अधिक ठेवाव्या लागतात, असं सांगून औषधनिर्मिती कंपन्यांनी गेली कित्येक वर्ष अमेरिकन लोकांची फसवणूक केली आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.   मात्र आता नवीन धोरणानुसार अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या औषधांची किंमत इतर कोणत्याही देशाने त्याच औषधासाठी दिलेल्या सर्वात कमी किंमतीइत...

May 10, 2025 1:42 PM

views 60

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी नवीन याचिका दाखल – निक ब्राउन

अमेरिकेत राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी अमेरिकेतल्या १५ राज्यांच्या गटानं नवीन याचिका दाखल केली आहे. वॉशिंग्टन राज्याचे ऍटर्नी जनरल निक ब्राउन यांनी काल सिएटलमध्ये पत्रकार परिषदेत ही  घोषणा केली.   ट्रम्प यांचा आदेश तेल, वायू, कोळसा आणि इतर जीवाश्म इंधन स्रोतांच्या विस्ताराला प्रोत्साहन देत असून,  पवन, सौर आणि बॅटरी-आधारित ऊर्जा उपक्रमांना वगळतो. त्यामुळे न्यायालयानं हा आदेश अवैध ठरवावा, आणि या आदेशाच्या आधा...

May 3, 2025 12:52 PM

views 73

अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी संचलन आयोजित केलं जाणार

पुढील महिन्यात १४ जून रोजी अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी संचलन आयोजित केलं जाणार आहे. काल व्हाईट हाऊस प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.  वॉशिंग्टन इथल्या नॅशनल मॉलमध्ये आय़ोजित एक दिवसाच्या कार्यक्रमात ६ हजार ६०० सैनिक, १५० लष्करी वाहनं आणि ५० विमानांचा सहभाग असणार आहे. पहिल्या महायुद्धाचा विजय दिन, असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं आहे. याच दिवशी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस देखील आहे.

April 30, 2025 1:38 PM

views 51

भारत आणि अमेरिकेदरम्यान आयात शुल्कासंदर्भातली बोलणी चांगल्या पातळीवर सुरु-डोनाल्ड ट्रंप

भारत आणि अमेरिकेदरम्यान आयात शुल्कासंदर्भातली बोलणी चांगल्या पातळीवर सुरु असून लवकरच व्यापार करार यशस्वी होईल, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे. ते काल मिशिगनमध्ये वार्ताहरांसी बोलत होते. या आठवड्याच्या सुरुवातीला, भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक असू शकतो, अशी आशा अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट बेसेंट यांनी व्यक्त केली.