April 25, 2025 1:20 PM

views 61

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियनने युक्रेनच्या कीव्हवर केलेल्या हल्ल्याबाबत केली नाराजी व्यक्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन सैन्यानं युक्रेनच्या कीव्हवर नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या हल्ल्यात १२ जण मृत्युमुखी पडले होते  तर ९० जण जखमी झाले होते. ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना फोन करून हल्ले थांबवण्यास सांगितलं.

April 22, 2025 9:46 AM

views 45

हावर्ड विद्यापीठाकडून ट्रम्प प्रशासनावर खटला दाखल

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने प्रस्तावित केलेली अब्जावधी डॉलर्सचा निधी कपात रोखण्यासाठी हावर्ड विद्यापीठाने प्रशासनाविरोधात खटलाTRUM केला आहे. ट्रम्प प्रशासनाने, संस्थेच्या विविधतेच्या उपक्रमांना आळा घालण्यासाठी आणि ख्रिस्तीविरोधी भावनांविरोधात लढण्यासाठी पाठवलेल्या मागण्या संस्थेनं नाकारल्यानं हा वाद वाढला आहे.   हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष अॅलन एम. गार्बर यांनी विद्यापीठ समुदायाला लिहिलेल्या पत्रामध्ये सरकारच्या या धोरणाचे गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होतील असं नमूद केलं आहे.  ट्रम्प प्रश...

April 16, 2025 10:15 AM

views 63

हावर्ड विद्यापिठाच्या अनुदानावर विपरित परिणाम होण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकी सरकारच्या मागण्या मान्य न केल्यास हावर्ड विद्यापिठाला देण्यात येणाऱ्या अनुदानावर विपरित परिणाम होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. ट्रंप प्रशासनाने या संस्थेसाठी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी गोठवण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेतील सर्वात जुन्या विद्यापीठाला भरती, प्रवेश आणि अध्यापन पद्धतींमध्ये बदल करण्याची मागणी प्रशासनानं केली आहे. दरम्यान हार्वर्ड विद्यापीठानं प्रशासनाच्या मागण्या नाकारल्या असून व्हाईट हाऊसवर त्यांच्या संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रय...

April 6, 2025 8:41 PM

views 36

अमेरिकेची १० % कर वसूलीला सुरुवात

अमेरिकेनं कालपासून काही देशांकडून १० टक्के इतका कर वसूल करायला सुरुवात केली. ही कर आकारणी काल मध्यरात्रीपासून अमेरिकेतली बंदरं, विमानतळ, सीमा शुल्क गोदामांवर करण्यात येत आहे. या शुल्काची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अधिकृत आदेश काढून केली होती. या निर्णयामुळे अमेरिकचे मित्र देश आणि अन्य देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरून येणाऱ्या काही वस्तूंवर २५ टक्के इतकी कर आकारणी केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयांचे परिणाम जगभरातल...

April 2, 2025 12:48 PM

views 64

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार असल्याचं अमेरिकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, ट्रम्प यांच्या घोषणेनुसार अमेरिकन वस्तुंवर कर लावणाऱ्या देशांवर परस्पर कर लागू केले जातील.   तर वाहनांच्या आयातीवर २५ टक्के कर उद्यापासून लागू केला जाईल. यामुळे अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याचा हेतू असून इतर देशांकडून चालणाऱ्या अन्याय्य व्यापारासाठी ही एक प्रकारे शिक्षा ठरणा...

March 14, 2025 10:21 AM

views 37

अमेरिकेत नवजात बालकांच्या नागरिकत्वाच्या हक्कावरील निर्बंध अंशत: लागू करण्यास ट्रम्प यांची विनंती

अमेरिकेत जन्म झाल्यामुळे बालकांना मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या हक्कावरील निर्बंध अंशत: लागू करण्यास परवानगी देण्याची विनंती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, अमेरिकेत बेकायदेशीर रीत्या राहणाऱ्या लोकांच्या या वर्षीच्या 19 फेब्रुवारीनंतर जन्मलेल्या मुलांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही, असा नियम ट्रम्प प्रशासनानं आणला आहे. हा नियम आतापर्यंत काही राज्यांनीच लागू केला आहे.

March 8, 2025 2:58 PM

views 70

रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

युक्रेनसोबत शांतता करार होत नाही तोपर्यंत रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्यात येईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशिया युक्रेनवर दडपशाही करत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.    ट्रम्प हे मागच्या काही दिवसात रशियाची बाजू घेत होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

March 7, 2025 1:50 PM

views 72

कॅनडा, मेक्सिकोच्या आयातीवर कर लागू करण्याचा निर्णय अमेरिकेनं पुढे ढकलला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर बहुतेक वस्तूंवरचा २५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय एक महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. त्यांनी काल ही घोषणा केली. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कॅनडा आणि मेक्सिकोशी केलेल्या व्यापार कराराचं पालन करणाऱ्या वस्तूंना ही सवलत लागू होईल. मात्र, अमेरिकेच्या निर्यातीवर शुल्क आकारणाऱ्या देशांवर अमेरिका येत्या २ एप्रिलपासून आयात कर लागू करण्यावर ठाम असल्याचं ट्रम्प यांचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी स्पष्ट क...

March 4, 2025 8:25 PM

views 50

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण करणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या सकाळी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण करणार आहेत. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं  पदभार स्वीकारल्यानंतरचं हे त्यांचं पहिलंच भाषण असेल. आपल्या भाषणामध्ये ट्रम्प त्यांच्या प्रशासनाच्या कृती आणि कायदेविषयक बाबींवर बोलणार आहेत  तसंच  पुढील चार वर्षांसाठीच्या  योजना  मांडणार आहेत.

March 4, 2025 1:48 PM

views 64

अमेरिकेची कॅनडा, मेक्सिको, चीनवर आयात शुल्क आकारण्याची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के तर चीनवर २० टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क आजपासून लागू झालं आहे. कॅनडाने १५० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकी वस्तूंवर २५ टक्के कर लादणार असल्याचं म्हटलं आहे.   चीनने अमेरिकेच्या कृषी आयातीवर १० ते १५ टक्के कर लावण्याची घोषणा केली असून मेक्सिकोनेही प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे. या करांमुळे कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत येणारे अंमली पदार्थ आणि स्थलांतरितांना आळा घालण्यासाठी अधिक कारवाई करता ये...