November 6, 2024 3:32 PM

views 68

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी झाले आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठी आवश्यक असलेली ५३८ पैकी २७० इलेक्टोरल मतं मिळवण्यात ते थोड्याच वेळापूर्वी यशस्वी ठरले. J D वान्स हे त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. फॉक्स न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांना २७७ तर डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अजून ३५ मतांची मोजणी शिल्लक आहे. एकूण ३१५ मतं मिळवू असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. तीन वे...

September 16, 2024 1:51 PM

views 59

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा इथल्या गोल्फ कोर्सवर एका संशयित बंदूकधाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिली आहे.   ट्रम्प यांनी, आपण सुरक्षित असून अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीत शर्यतीत त्याच जोमानं पुढे जाणार असल्याची ग्वाही आपल्या समर्थकांना एका इमेलद्वारे दिली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरि...

September 13, 2024 1:09 PM

views 56

कमला हॅरिस यांच्यासोबत आणखी प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये सहभागी न होण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यासह राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्रेसिडेंन्शियल डिबेट अर्थात वादविवादात सहभागी होणार नसल्याचं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. फिलाडेल्फियामध्ये झालेल्या सुरुवातीच्या वादविवादात विजयी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आणि महत्त्वाच्या वृत्त वाहिन्यांवरचे आमंत्रण हॅरिस स्वीकारत नसल्याचा दावा केला. हॅरिस यांनी आणखी वादविवादांची मागणी केली. मतदारांप्रती ते कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. एका सर्वेक्षणानुसार ६३ टक्के लोकांनी या वा...

August 3, 2024 12:31 PM

views 64

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात होणार लढत

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीसाठी डेमॉक्रॅटिक पक्षाकडून अधिकृतरीत्या उमेदवारी मिळवली आहे. यासाठी पक्षाच्या प्रतिनिधींची जितकी मतं आवश्यक आहेत, तितकी मतं हॅरिस यांना मिळाल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष जेमी हॅरिसन यांनी काल केली. एकंदर ४ हजार मतांपैकी २ हजार ३५० मतं हॅरिस यांना मिळाली. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात लढत होणार आहे.

July 28, 2024 2:22 PM

views 55

‘निवडून आल्यास अमेरिकेला जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू’

आपण निवडून आलो तर अमेरिकेला या जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू, असं आश्वासन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. नॅशव्हिल इथं आयोजित बिटकॉइन २०२४ या परिषदेत ते बोलत होते. आपलं प्रशासन क्रिप्टो चलनासाठी धोरण तयार करणार असून त्यासाठी सल्लागार समितीही स्थापन केली जाईल, असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.

July 16, 2024 12:48 PM

views 55

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अधिकृत उमेदवार

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षानं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. मिलवॉकी इथं झालेल्या रिपब्लिकन राष्ट्रीय समिती सदस्यांच्या बैठकीत ट्रम्प यांना बहुमत मिळाल्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे ट्रम्प सलग तिसऱ्या वेळा रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होणार आहे.   ओहायोचे सेनेटर जे. डी. व्हान्स आपले उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवार असतील, असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. व्हान्स यांची...