January 23, 2025 3:08 PM

views 33

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या घोषणेविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाची न्यायालयात धाव

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या योजनेबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेली राज्यं आणि नागरी हक्क गटांच्या युतीनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला आहे. कोलंबिया आणि सॅन फ्रान्सिस्को शहरासह २२ डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्यांनी बोस्टन आणि सिएटल इथल्या संघीय न्यायालयांमध्ये हे खटले दाखल केले.   ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच अमेरिकेतील स्थलांतराला नियंत्रित करण्याच्या उद्देशानं एकगठ्ठा कार्यकारी आदेश जारी केले. अध्यक्षांनी आपल्...

January 21, 2025 7:02 PM

views 57

ट्रम्प यांच्या निर्णय धडाक्यानंतर देशातले शेअर बाजार कोसळले

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारांवर उमटले. जागतिक व्यापारासाठी ब्रिक्स राष्ट्रांना लक्ष्य करून अमेरिकन डॉलवरचं अवलंबित्व कमी करणाऱ्या देशांवर १०० टक्के कर लादण्याच्या ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारताच्या दोन्ही शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण पाहायला मिळाली.   मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर १ हजार २३५ अंकांची घसरण झाली, आणि तो ७५ हजार ८३८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३२० अंकांची घसरण नोंदवत २३ ...

January 21, 2025 1:31 PM

views 48

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासातच अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. स्थलांतरितांच्या प्रवेशाला आळा घालणं, जीवाश्म इंधनाचं उत्पादन वाढवणं आणि २०२१ पॅरिस हवामान करारासह पर्यावरणीय नियम मागे घेणं हे निर्णय ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी घेतले. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. कोविड महामारीची साथ निट न हाताळणं आणि त्यावर तातडीच्या उपाययोजना न करणं या कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. जागतिक आरोग्...

January 20, 2025 1:05 PM

views 55

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा आज राष्ट्रध्यक्षपदाचा शपथविधी

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत. ते वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सत्तेच्या अधिकृत हस्तांतरणाचा भाग म्हणून ट्रम्प उद्घाटन भाषण देखील करतील. जेडी व्हॅन्स अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळ्याला अनेक परदेशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले, इटल...

January 11, 2025 10:51 AM

views 48

डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात मोठा दिलासा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांनी बिनशर्त मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी, न्यूयॉर्क न्यायालयानं ट्रम्प यांना कोणत्याही शिक्षेशिवाय दोषी ठरवलं आहे.   याचा अर्थ ट्रम्प तुरूंगवास, दंड होणार नाही. या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. एखाद्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतरही राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत.

January 8, 2025 1:42 PM

views 41

शपथविधीपूर्वी ओलिसांची सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील- डोनाल्ड ट्रम्प

आपल्या शपथविधीपूर्वी हमासने गाझामधल्या ओलिसांची सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. फ्लोरिडा इथे काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या २० जानेवारी रोजी ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे.

December 29, 2024 6:44 PM

views 65

एचवन बी व्हिसा हा उत्तम उपक्रम असून त्याने उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक  मिळवून दिले – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत अमेरिकेच्या एच-वन बी व्हिसा कार्यक्रमाची पाठराखण केली आहे. एचवन बी व्हिसा हा उत्तम उपक्रम असून त्याने  अमेरिकेतल्या खास नोकऱ्यांसाठी उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक  मिळवून दिले असं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी परदेशी व्यक्तींना रोजगारासाठी व्हिसा देण्याच्या धोरणाबाबत कडक टीका केली होती.   एचवन बी व्हिसामुळे अमेरिकन कंपन्यांना उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक मिळतात ज्य़ातून...

November 17, 2024 11:36 AM

views 57

डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा विभागाच्या प्रमुखपदी ख्रिस राईट यांची निवड जाहीर केली

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा विभागाच्या प्रमुखपदी ख्रिस राईट यांची निवड जाहीर केली आहे. राईट हे लिबर्टी एनर्जी या जीवाश्म इंधनाच्या पुरस्कर्त्या संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ट्रम्प यांच्या तेल आणि वायूचं उत्पादन वाढवण्याच्या उद्दिष्टांशी त्यांची मतं जुळतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय हवामान बदलासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल ट्रम्प यांच्या धोरणाचं ते समर्थन करतील अशी शक्यता आहे. हवामान बदलाच्या चिंतेला अतिशयोक्तीपूर्ण म्हणून...

November 7, 2024 1:21 PM

views 48

निवडणुकीत विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी केलं डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. देशाच्या एकसंध प्रगतीसाठी सत्तेचं शांततापूर्वक हस्तांतरण केलं जाईल असं ते म्हणाले. ज्यो बायडन आज देशाला उद्देशून आपला संदेश देणार असल्याचंही व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे. उपराष्ट्राध्यक्ष व या निवडणुकीतील पराभूत उमेदवार कमला हॅरिस यांनीही दूरध्वनी वरुन  डोनाल्ड ट्रम्प याचं अभिनंदन केलं आहे.   

November 6, 2024 8:17 PM

views 53

जगातली युद्ध थांबवणं हे आपल्या सरकारचं प्रमुख धोरण असेल – डोनाल्ड ट्रम्प

जगातली युद्ध थांबवणं हे आपलं प्रमुख धोरण असेल, असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विजयानंतरच्या पहिल्या भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेत स्थलांतरितांना अवैध मार्गानं येता येणार नाही या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.   अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत २७७ इलेक्टोरल मतं मिळवून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. हे जगातलं सर्वात भव्य पुनरागमन असल्याचं त्याच्या पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे डी वान्स यांनी म्हटलं आहे.   अमेरिके...