October 14, 2025 1:18 PM

views 123

गाझा पट्टीतला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या

गाझा पट्टीत गेली दोन वर्ष सुरु असलेला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प, इजिप्त आणि तुर्कीएचे अध्यक्ष आणि कतारचे अमीर यांनी काल इजिप्त मध्ये शर्म अल-शेख इथं स्वाक्षरी केली. यावेळी ३०पेक्षा जास्त देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.     या शांतता शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,  इजिप्तचे अध्यक्ष  अब्देल-फत्ताह अल-सिसी, तुर्कीएचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी, यांनी हमास-इ...

October 13, 2025 6:42 PM

views 98

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

युद्धबंधीसाठी महत्त्वाची भूमिका निभावल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरनं जाहीर झाला आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग ट्रम्प याना हा पुरस्कार प्रदान करतील. या आधी हा सन्मान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रदान करण्यात आला होता.

October 7, 2025 11:12 AM

views 148

अमेरिका मध्यम आणि अवजड ट्रक्सच्या आयातीवर 25 टक्के शुल्क येत्या 1 नोव्हेंबरपासून लादणार

सर्व प्रकारच्या मध्यम आणि अवजड ट्रक्सच्या येत्या 1 नोव्हेंबरपासून आयातीवर 25 टक्के शुल्क लादण्यात येईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेत सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक ट्रकचालक म्हणून काम करतात आणि ट्रक वाहतूक उद्योग हा तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्सनं म्हटलं आहे.

September 8, 2025 3:06 PM

views 61

रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष लवकरच संपेल- डोनाल्ड ट्रम्प

रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष लवकरच संपेल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार असून युरोपीय देशांचे नेतेही यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी अमेरिकेला येणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली.   दुसरीकडे अमेरिका रशियावर दुसऱ्या टप्प्यातले निर्बंध लादण्याची तयारी करत असल्याचंही ट्रम्प यांनी आज जाहीर केलं. ते व्हाईट हाऊस परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. अमेरिका आणि युरोपीय...

September 6, 2025 8:16 PM

views 59

भारत आणि अमेरिका संबंधांबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी आज समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं.       भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध विशेष असून त्याबाबत चिंता करण्यासारखं काही नाही असं ट्रम्प यांनी...

September 6, 2025 1:38 PM

views 125

भारत आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि अमेरिकेतल्या संबंधाबाबत ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल  प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं आहे.     भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध विशेष असून त्याबाबत चिंता करण्यासारखं काही न...

July 26, 2025 1:53 PM

views 93

‘न्यू स्टार्ट’ समझोता करारातल्या तरतुदी जपण्याला आपली पसंती -डोनाल्ड ट्रम्प

अण्वस्त्रकपातीसाठी रशियाबरोबर केलेल्या ‘न्यू स्टार्ट’ समझोता करारातल्या तरतुदी जपण्याला आपली पसंती असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. स्कॉटलंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या कराराच्या  दिशेने काम करायला आपण  सुरुवात करत असल्याचं ते यावेळी म्हणाले.    अमेरिका आणि रशिया यांच्यात २०१० मधे झालेल्या ‘न्यू स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी’, म्हणजेच ‘न्यू स्टार्ट’ करारानुसार या बलाढ्य अण्वस्त्रधारी देशांनी अण्वस्त्र आणि व...

July 19, 2025 3:15 PM

views 49

ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नलवर दाखल केला मानहानीचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नल आणि त्याच्या मालकांविरोधात  १० अब्ज डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. वृत्तपत्राच्या मालकांमध्ये रुपर्ट मर्डोक आणि डोव्ह जोन्स यांच्या सह इतर काही व्यक्तींचा समावेश आहे.    वॉल स्ट्रीट जर्नलनं २००३ साली जेफ्री एपस्टाईन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांच्या यादीत ट्रम्प यांचं नाव प्रकाशित केलं होतं. या बातमीमुळे आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली असून आर्थिक नुकसान झाल्याचं ट्रम्प यांनी मियामी इथल्या न्यायालयात दाखल केलेल्...

July 15, 2025 1:05 PM

views 28

रशियातून इंधन, गॅस आणि युरेनियम आयात करणाऱ्या देशांवर 100% वाढीव आयातशुल्क लादण्याचा ट्रंप यांचा इशारा

जे देश रशियातून इंधन, गॅस आणि युरेनियम आयात करतात त्यांच्यावर शंभर टक्के वाढीव आयातशुल्क लादण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. रशिया युक्रेनबरोबरचं युद्ध संपवण्यात अपयशी ठरत असल्यानं आपण नाखूश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी काल व्हाईट हाऊसमध्ये ट्रंप यांची भेट घेतली. त्यानंतर ट्रंप बोलत होते. रशियानं युक्रेनबरोबर शांतता करार केला नाही, तर वाढीव आयातशुल्क लादण्यासाठी त्यांनी पन्नास दिवसांची मुदत जाहीर केली आहे. ट्रंप यांचा इशारा रश...

July 14, 2025 1:21 PM

views 44

अमेरिका युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार

अमेरिका लवकरच युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.युक्रेनवर रशियाकडून सातत्यानं हवाई हल्ले होत आहेत. युक्रेनला हवाई संरक्षणाची अत्यंत गरज असून त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही क्षेपणास्त्र  दिली जात असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  सांगितलं. मात्र, किती क्षेपणास्त्र युक्रेनला देणार हे अद्याप ठरलं नसल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.  या क्षेपणास्त्रांचा खर्च युरोपियन युनियन करणार आहे. ...