January 11, 2025 9:40 AM

views 35

केंद्राकडून राज्यांना दीड लाखांहून अधिक कराच्या रकमेचं हस्तांतरण

केंद्र सरकारकडून राज्यांना काल डिसेंबर २०२४ साठी १ लाख ७३ हजार ३० कोटी रुपयांच्या करांच्या रकमेचं हस्तांतरण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्राच्या १० हजार ९३० कोटी ३१ लाख रुपयांचा वाटा आहे. राज्यांना भांडवली खर्चाला गती देता यावी तसंच विकासकामं आणि कल्याणकारी उपक्रमांना वित्त पुरवठा करणं शक्य व्हावं , यासाठी हा निधी जारी करण्यात आला असल्याचं वित्त मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे याबद्दल आभार...

January 10, 2025 3:04 PM

views 35

राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली – मुख्यमंत्री

पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आज चंद्रपूरमधे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भाच्या विकासाकरता कन्नमवार यांनी केलेल्या कार्याचा गौरव फडणवीस यांनी यावेळी केला.

January 10, 2025 3:47 PM

views 28

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरुप बदल करण्याची गरज – मुख्यमंत्री

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरुप बदल करण्याची गरज असून यासंदर्भात तातडीनं आराखडा तयार करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी काल राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या आराखड्यासंदर्भात उद्योग विभागाचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडच्या जागा वाटपाची प्रक्रिया १०० दिवसात पूर्ण करुन नवीन १० हजार जमीनींच्या अधिग्रहणासाठी प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांना अप्रेंटीस...

January 8, 2025 7:32 PM

views 42

शासकीय रुग्णालयात दर्जेदार सेवा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना ते मुंबईत बोलत होते.  दुध भेसळ रोखणे, मंदिर आणि देवस्थानातल्या प्रसादाची गुणवत्ता तपासणीची कामे प्राधान्याने करा असंही ते म्हणाले.

January 8, 2025 3:29 PM

views 33

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण

मुंबई महानगरपालिकेनं नूतनीकरण केलेल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. संग्रहालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन होत असून आपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय उभारणीचा उद्देश आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

January 7, 2025 7:40 PM

views 47

मुख्यमंत्र्यांचा सात कलमी कृती कार्यक्रम; सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आदेश

सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. त्यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या शंभर दिवसांत प्राधान्यानं करायच्या कामांबाबत सविस्तर सूचना प्रशासनाला दिल्या. त्यावरच्या कार्यवाहीचा आढावा येत्या १५ एप्रिलला घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.    विभाग, क...

January 6, 2025 3:41 PM

views 140

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामं राज्यात सुरू आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्यात विविध ठिकाणी महारेलनं उभारलेल्या ७ उड्डाणपुलांचं नागपुरातून लोकार्पण करताना ते बोलत होते.   एका बाजूला केंद्र शासनाचे विविध प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनानं हाती घेतलेले विविध प्रकल्प यातून समृध्द महाराष्ट्र घडत आहे. येत्या काळात महारेल मार्फत २०० रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची कामं पूर्ण केली ...

January 6, 2025 10:00 AM

views 39

बीड हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणातल्या पाच आरोपींना पकडण्यात आलं असून, हत्या प्रकरणात सहभागी आणि मदत करणाऱ्यांना देखील सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

January 5, 2025 7:44 PM

views 39

महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथं झालं. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने ३७३ कोटी रुपये खर्चातून हे उड्डाणपूल बांधले आहेत.

January 5, 2025 7:27 PM

views 30

आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण

आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध स्पर्धांमधे चमकदार कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.   महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पणही आज  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झालं. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महार...