January 4, 2025 8:31 PM

views 48

राज्यातल्या  प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची  संख्या वाढण्याची गरज-मुख्यमंत्री

राज्यातल्या  प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची  संख्या वाढण्याची गरज आहे. त्यासाठी सध्या असलेल्या एकल पडदा चित्रपटगृहांना काही सवलती देता येतील का, तसंच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच ठिकाणी दाखवता येतील का याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या  विविध नियोजन प्राधिकरणांचं सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावं , असंही ते म्हणाले.

January 4, 2025 8:53 PM

views 41

शहरी भागातही कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणं राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबईत झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणं राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महिला आणि बालविकास विभागाला दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृहात या विभागाच्या पुढील १०० दिवसांत करायच्या कामांचा  मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.    लाडकी बहिण योजना राबवताना प्रत्येक टप्प्याचा आढावा घेणाऱ्या "द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. महि...

January 4, 2025 2:37 PM

views 128

भारतीय सेनादल हे जगातल्या सर्वोत्तम सेनादलांपैकी एक असून भूदल, नौदल आणि वायुदल अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम – मुख्यमंत्री

भारतीय सेनादल हे जगातल्या सर्वोत्तम सेनादलांपैकी एक असून भूदल, नौदल आणि वायुदल अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. समर्थ भारत, सक्षम सेना या संकल्पनेअंतर्गत लष्कराच्या दक्षिण कमांडने पुण्यात आयोजित केलेल्या नो युवर आर्मी मेळाव्याच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल बोलत होते. या मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षणक्षेत्रातले स्टार्टअप यासह नवोन्मेष क्षेत्रात सुरू असलेलं प्रचंड काम बघायला मिळत आहे, असं फडण...

January 3, 2025 7:33 PM

views 68

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १० एकर जमीन अधिग्रहित

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी त्यांचं स्मारक उभं करण्यासाठी १० एकर जमीन तात्काळ अधिग्रहित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. ते आज सातारा जिल्ह्यात नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त ग्रामविकास विभाग आणि सातारा जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी आणखी पाच वर्षांनी साजरी होणार आहे. त्यापूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजे...

January 3, 2025 7:42 PM

views 38

पांडुरंगाच्या आशिवार्दानं मोठा विजय प्राप्त झाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पांडुरंगाच्या आशिवार्दानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी इथं भेट दिल्यानंतर व्यक्त केली. वारकरी विचारानंच आपला महाराष्ट्र पुढे गेला आहे, भविष्यातही पुढे जात राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. इंद्रायणी नदीचं पाणी शुद्धिकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे, तो युद्धपातळीवर पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी बातमीदारांशी बोलताना दिलं.

January 3, 2025 10:23 AM

views 66

पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, चार हजार 849 एकर पडजमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार

वैयक्तिक आधार कार्डाप्रमाणेच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीही आधार कार्डच्या माध्यमातून युनिक आयडी तयार करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामे करतात. त्यातून तीच ती कामे होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी असावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. प्रत्येक कामाची माह...

January 1, 2025 8:39 PM

views 55

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताराक्कासह ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात ८ महिला आणि ३ पुरुष आहेत. त्यांच्यावर राज्यात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसं असून, छत्तीसगड सरकारनंही त्यांच्यावर बक्षिस जाहीर केलं होतं.    यात दंडकारण्य झोनल कमिटी प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का, ३डिव्हिजन किमिटी मेंबर, १ उपकमांडर, तर ३ एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचं जीवन जगण्यासाठी ८६ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.    उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाल...

December 31, 2024 7:52 PM

views 39

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे जबाबदार असतील, ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्या सर्वांवर कडक कारवाई करू, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात गुंडांचं, हिंसेचं, खंडणीखोरांचं राज्य चालू देणार नाही. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड यांना शरणागती पत्करावी लागली, असं सांगून उर्वरित फरार आरोपींना पकडण्यासाठी पथकं काम करत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

December 31, 2024 8:12 PM

views 60

सहाय्य योजनांचं अनुदान थेट बँक खात्यात वर्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचं अनुदान DBT अर्थात थेट लाभ हस्तांतरण पोर्टलद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत सामाजिक न्याय, आदिवासी विभागाच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याचा  मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन आदी  योजनांच्या  अर्थसाहाय्याचं  वितरण या पोर्टल च्या माध्यमातून केलं जाणार आहे. विद...

December 31, 2024 3:21 PM

views 50

चित्रपट चित्रीकरणासाठी ‘एक खिडकी पद्धतीने परवानगी’ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनासोबतच सांस्कृतिक विभागाशी संबंधित सर्व बाबींमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्यानं चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ‘एक खिडकी पद्धतीने परवानगी’ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईत काल झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाच्या येत्या शंभर दिवसांच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी  घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी त्यांचं कार्य, सर्व शाळा आणि महाविद्याल...