January 26, 2025 7:26 PM

views 37

मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन यात मोठी बचत होणार असून प्रदूषण कमी करण्यात हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तरवाहिनी मार्गासह इतर तीन आंतरमार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुल्या होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच मंत्री आशीष शेलार, मंगल प्...

January 24, 2025 9:11 AM

views 40

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं जगभरातील विविध दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले आहेत; यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.   मुख्यमंत्र्यांनी काल दावोसमधून दूरस्थ प्राणलीच्या माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत मुंबईतून सहभागी झाले होते. दावोसमध्ये गुंतवणू...

January 18, 2025 2:41 PM

views 38

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार- मुख्यमंत्री

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते.   ग्रामीण आणि दुर्गम भागात डॉक्टरांना पोहोचणं शक्य नसतं तिथले रुग्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकरणार आहेत. दर्जेदार आणि चांगल्या आरोग्य सेवेसाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे, असं फडणवीस म्हणाले. या...

January 18, 2025 1:34 PM

views 25

मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी सर्वसमावेशक मंचाची निर्मिती

मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी एक सर्वसमावेशक मंच विकसित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.   मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले. 

January 18, 2025 10:43 AM

views 27

जागतिक आर्थिक मंच परिषदेत मुख्यमंत्री होणार सहभागी

दावोसमध्ये येत्या 20 ते 24 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात आणखी परकीय गुंतवणूक आणण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.   या पूर्वी फडणवीस त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा दावोसमध्ये झालेल्या आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. औद्योगिक विकासात राज्याला पाचव्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावरआणण्यात याचं महत्वाचं योगदान होतं. या भेटीदरम्यान अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत.

January 17, 2025 7:23 PM

views 26

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारी या काळात दावोसला जाणार आहेत. राज्याच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

January 17, 2025 7:39 PM

views 37

नाशिक – त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोरची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाशिक जिल्ह्याला राज्याचं धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिने नाशिक - त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोरची निर्मिती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे २०२७ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पूर्वतयारीविषयी आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातल्या धार्मिक परंपरेचे दर्शन घडावं, यासाठी नाशिकजवळ मोठं महाकुंभ तयार करावं. यामध्ये देशातली तसंच राज्यातली मंदिरं, तिर्थक्षेत्रं, सांस्कृतिक ...

January 16, 2025 7:56 PM

views 39

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   सिडबी-स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्ट अपसाठी २०० कोटी रुपये तर प्रत्येक प्रादेशिक  विभागाला ३० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील स्टार्टअप जगात पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत, असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.   &...

January 13, 2025 4:00 PM

views 24

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवा असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.   नवी मुंबईत शेतमालासाठी महा बाजार उभारण्याचे नियोजन आहे. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रक...

January 11, 2025 8:08 PM

views 40

नागपुरातल्या मेयो तसंच मेडिकलमधल्या विविध विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नागपुरातल्या मेयो तसंच मेडिकलमधल्या विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज घेतला. इथल्या वैद्यकीय सेवासुविधा वाढविण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. किती कामं पूर्ण झाली याचा आढावा एप्रिल महिन्यात पुन्हा घेणार  असल्याचंही त्यांनी सांगितलं.