खेळ

March 22, 2025 10:02 AM

views 45

चेन्नईतल्या स्क्वॅश स्पर्धेत भारतीय खेळाडूंना विजेतेपद

चेन्नईत सुरू असलेल्या पीएसए चॅलेंजर स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंह हिने महिला गटात तर वीर चोत्राणी याने पुरूष गटात विजेतेपद पटकावले.   तिसऱ्या मानांकित अनाहत सिंगने अंतिम सामन्यात अव्वल मानांकित आकांक्षा साळुंखेचा पराभव केला. तर दुसऱ्या मानांकित वीर चोत्राणीने अंतिम सामन्यात फ्रेंच खेळाड...

March 22, 2025 9:34 AM

views 35

दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला 3 सुवर्णपदक

नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक मिळवलं.   अकोल्याच्या चैतन्य पाठकनं 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरनं गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावलं.   मीनाक्षी जाधव हिनं ग...

March 21, 2025 1:43 PM

views 73

भारताकडे ११व्या आशियाई जलतरण स्पर्धेचं यजमानपद

११व्या आशियाई जलतरण स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असणार आहे. अहमदाबादमधे नारनपुरा क्रीडा संकुलात १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत पोहणे, डायव्हिंग, आणि वॉटर पोलो यासारख्या विविध जलतरण स्पर्धांचा समावेश असेल. 

March 21, 2025 9:45 AM

views 57

Kabaddi World Cup : भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने काल वेल्सचा 102-47 असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व आणि महिला संघाचा उपांत्यफेरीतील सामने आज होणार आहेत.

March 20, 2025 8:08 PM

views 42

नवी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन

खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन आज नवी दिल्ली इथे केंद्रीय क्रीडा आणि युवाव्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं. या स्पर्धेतले खेळ दिल्लीत तीन ठिकाणी आयोजित केले असून, १ हजार ३००हून अधिक खेळाडू ६ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. यात बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, तिरंदाजी, पॉवर...

March 20, 2025 3:17 PM

views 39

Champions Trophy : भारतीय संघाला ५८ कोटी रुपयांचं रोख पारितोषिक

आयसीसी विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला क्रिकेट नियामक मंडळानं ५८ कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं आहे. मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सांगितलं की आयसीसीचं विजेतेपद लागोपाठ मिळवणं ही विशेष कौतुकाची बाब आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुबईमधे झालेल्या अंतिम सामन्यात न...

March 20, 2025 10:22 AM

views 44

खेलो इंडिया स्पर्धांच्या दुसऱ्या आवृत्तीला आजपासून प्रारंभ

दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धांच्या दुसऱ्या आवृत्तीला आजपासून नवी दिल्ली इथं प्रारंभ होत आहे. या स्पर्धांमध्ये 36 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील १३०० हून अधिक खेळाडू सहभागी घेणार आहेत. 27 तारखेपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. नवी दिल्ली इथं जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम आणि...

March 19, 2025 1:40 PM

views 63

Badminton : दुहेरी गटात भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत त्यांनी स्वित्झर्लंडच्या ॲलाईन मुलर आणि नेदरलँड्सच्या केली व्हॅन बुइटेन या जोडीचा २१-१६, २१-१७ असा पराभव केला. उद्या होणाऱ्या उपउ...

March 19, 2025 10:31 AM

views 71

खेलो इंडिया पॅरा गेम्स २०२५ च्या शुभंकर, बोधचिन्ह आणि गाण्याचं अनावरण

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथे आगामी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 च्या शुभंकर, बोधचिन्ह आणि गाण्याचं अनावरण केलं. दिव्यांगांसाठीचे पॅरा गेम्स उद्यापासून 27 मार्चपर्यंत दिल्लीत होणार आहेत. खेलो इंडिया उपक्रमाने सहभागी होऊ शकणाऱ्या खेळाडूंना एक उल्लेखनीय व्यास...

March 18, 2025 8:28 PM

views 33

कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयी सलामी

इंग्लंडमधे सुरु असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. ड गटात वॉल्व्हरपॅम्प्टन इथं आज संध्याकाळी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघानं वेल्स संघावर ८९-१८ असा दणदणीत विजय नोंदवला.     भारतीय पुरुष संघांचा दुसरा सामना आज रात्री स्कॉटलंडबरोबर होणार आहे. या स्पर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.