प्रादेशिक बातम्या

September 3, 2024 7:02 PM

views 49

नागपुरात तान्ह्या पोळ्यानिमित्त मारबत आणि बडग्याची मिरवणूक

तान्ह्या पोळ्यानिमित्त नागपुरात आज मारबत आणि बडग्याची  मिरवणूक काढण्यात आली. नागपुरातल्या जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळी मारबत, तर नेहरू पार्क इतवारी इथून काळ्या मारबतीची मिरवणूक निघाली. या मारबत उत्सवाला १४४ वर्षांची परंपरा आहे. वर्षभरातल्या विविध घटना आणि विषयांवर भाष्य करणाऱ्या बडग्यांची देखील मि...

September 3, 2024 8:55 PM

views 100

अहमदनगर जिल्‍ह्याचा नामांतराचा मार्ग सुकर

अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव द्यायला रेल्‍वे मंत्रालयानं हिरवा कंदिल दिल्यानं जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचं जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितलं.   जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर महायुती सरकारनं अहिल्‍य...

September 3, 2024 8:29 PM

views 50

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

महाराष्ट्र विधान परिषदेनं स्थापनेपासून आत्तापर्यंत गेल्या १०३ वर्षांमध्ये इथल्या लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम केलं आणि जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत. त्या आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्...

September 3, 2024 6:45 PM

views 30

२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

ई-गव्हर्नन्स हा विकासाचा एक मूलभूत घटक असून तो सरकारला अधिक जबाबदार, सर्वसमावेशक आणि नागरिक केंद्रित बनण्यासाठी सहायक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या २७व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. ‘विकसित भारत-सुरक्षित आणि शाश्व...

September 3, 2024 6:43 PM

views 37

विद्यार्थीनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

राष्ट्रपतींनी आज पुण्यात सिम्बायोसिस विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित केलं. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थीनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करायला हवं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशाच्या विकासात महिलांचा अविभाज्य वाटा असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.    दीक्षांत समारंभात स...

September 3, 2024 7:04 PM

views 66

ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांचा संप

एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवा सुविधा मिळाव्यात, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, तसंच इतर सुविधाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच असाव्यात ही त्यांची प्रमुख मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं राज्...

September 3, 2024 10:21 AM

views 47

मराठवाड्यात २८४ मंडळात अतिवृष्टी

मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कायम असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या २८४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, ६३ गावांना फटका बसला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होत आहे. दरम्यान, मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढ...

September 2, 2024 8:27 PM

views 67

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज जाहीर झाले. यावेळी  विविध प्रवर्गांमधे ११० जणांची पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. २०२३-२४ या वर्षासाठी ३८ प्राथमिक शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ३९ माध्यमिक शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. ...

September 2, 2024 8:02 PM

views 25

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. १० कोटी ८७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झाली असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे.  &n...

September 2, 2024 7:26 PM

views 20

जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबा यात्रेत लाखो भाविकांची मांदियाळी

जेजुरीमध्ये आज सोमवती अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक आले होते. दुपारी १ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. यानंतर बंदुकीच्या फैरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली. गडकोटाबाहेर सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यानंतर पायरीमार्ग, ऐतिहासिक चिंच बागेतील गौतमेश्वर मं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.