प्रादेशिक बातम्या

September 4, 2024 3:22 PM

views 53

पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पिकांचं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सगळ्या नुकसानाची माहिती घेऊन लवकरात लवकर पंचनामे कर...

September 4, 2024 4:02 PM

views 35

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   विदर्भात काही भागात पावसाची संततधार राहणार असून सातारा आणि पुणे तसंच, पश्चिम महाराष्ट्रातल्...

September 4, 2024 12:19 PM

views 28

राज्यात कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार यासारख्या जलजन्य आजारांच्या रुग्णात वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात पाऊस जास्त झाल्यानं कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार यासारख्या जलजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग उपाययोजना करत असून सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेल्या गावांची यादीही तयार करण्यात येत आहे. यंदा जानेवारी ते ...

September 4, 2024 10:51 AM

views 20

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातले एसटी कर्मचारी बेमुदत संपावर

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला. परिणामी पुणे, सातारा, नाशिक, सांगलीसह राज्यभरातील अनेक आगारातून एसटी बस बाहेर पडल्या नाहीत. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना एस. टी. कर्मचाऱ्या...

September 4, 2024 10:47 AM

views 55

२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा मुंबईत प्रारंभ

ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचं माध्यम आहे. यामधल्या पारदर्शकतेमुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘ई-गव्हर्नन्स’ या विषयावरच्या २७व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना ते काल मुंबईत बोलत होते. ‘...

September 4, 2024 9:58 AM

views 60

महाराष्ट्र विधान परिषदेनं जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांचे गौरवोद्गार

विधान परिषदेनं विविध महत्वपूर्ण निर्णय, कायदे करण्याबरोबरच लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचं काम केलं आहे; एका जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावत, देशाच्या संसदीय प्रणालीत महाराष्ट्र विधीमंडळाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी काढले. महा...

September 4, 2024 9:49 AM

views 36

शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं – राष्ट्रपतींचं आवाहन

सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पुण्यात केलं. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या २१व्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. ज्ञानामध्ये जगात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजातील विविध घटकांच्या ग...

September 3, 2024 8:16 PM

views 33

नाशिक : कृषी आणि विपणन विभागाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सीबीआयच्या ताब्यात

केंद्र सरकारच्या कृषी आणि विपणन विभागाच्या नाशिक इथल्या कार्यालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना आज सीबीआयनं रंगेहाथ पकडलं. या अधिकाऱ्यानं एगमार्कचा परवाना देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयनं सापळा रचून ही कारवाई केली. विशाल तळवडकर...

September 3, 2024 7:23 PM

views 42

राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम

राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात रेणापूर इथं आज दुपारी सुधा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण वाहून गेले. स्थानिक प्रशासन त्यांचा शोध घेत  आहे.    परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली. दमदार पावसामुळ...

September 3, 2024 7:09 PM

views 33

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. जयदीप याच्यावर पुतळ्याच्या बांधकामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. पुतळा कोसळल्याच्या दिवसापासून जयदीप फरार आहे. या प्रकरणातला दु...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.