प्रादेशिक बातम्या

September 4, 2024 7:28 PM

views 33

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

लातूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी आज पाहणी केली. उदगीर तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला.   पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ म...

September 4, 2024 7:25 PM

views 21

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत नवीन बटाटा यायला सुरुवात

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात कर्नाटकातून बेळगांव इथून नवीन बटाटा यायला सुरुवात झाली आहे. चवीला चांगला असल्यानं या बटाट्या ला नेहमीच बाजारात मागणी असते. मात्र, सध्या बाजारात जुना बटाटा अधिक असल्यामुळे जुन्या बटाट्याचे दर चढेच आहेत. जुना बटाटा प्रतिकिलो २४ ते २९ रुपये, तर नवी...

September 4, 2024 7:23 PM

views 22

रत्नागिरी जिल्ह्यात व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीप्रकरणी ४ जणं वन विभागाच्या ताब्यात

व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातल्या मौजे वालोपे इथं ४ जणांना वन विभागानं ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन किलो अंबरग्रीस आणि दोन दुचाकी वाहनं जप्त केली आहेत.   दोन आरोपी मंडणगड तालुक्यातले, तर दोन आरोपी दापोली तालुक्यातले आहेत. या चौघां...

September 4, 2024 7:18 PM

views 12

कुडाळ रेल्वे स्थानकाच्या परिसर सुशोभीकरणाचं रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण

  कुडाळ रेल्वे स्थानकाच्या परिसर सुशोभीकरण कामाचं लोकार्पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झालं.   कोकण रेल्वे मार्गावरच्या १२ स्थानकांपैकी सिंधुदुर्गातल्या चार स्थानकांच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालं असून येत्या सहा तारखेला रायगडमधल...

September 4, 2024 7:05 PM

views 33

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीतून संपकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कालपासून सुरू असलेल्या संपामुळं प्रवाशांचे हाल सुरू आहे.   गणेशोत्सवाच्या तोंडावर हा संप पुक...

September 4, 2024 7:01 PM

views 26

महायुतीनं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग आणि सन्मान द्यावा – रामदास आठवले

महायुतीनं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग द्यावा आणि सन्मान द्यावा अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. केंद्रीय मंत्रीमंडळात तिसऱ्यांदा सहभागी झाल्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मुंबईत त्यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.   रिपब्लिकनच्य...

September 4, 2024 5:17 PM

views 16

शस्त्रानं केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या सहा जणांना अटक

वाशिम जिल्ह्यातल्या नागठाना इथे धारदार शस्त्रानं केक कापून वाढदिवस साजरा करत समाजमाध्यमावर त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सहा जणांना वाशीम ग्रामीण पोलीसांनी नुकतीच शस्त्रासह अटक केली. यात खंजीर,तलवारी,गुप्ती यांच्यासह दोन बंदुकांचाही समावेश आहे. या प्रकरणी भारतीय हत्यार अधिनियमा नुसार गुन्हा नोंदवण...

September 4, 2024 5:23 PM

views 42

मूलभूत सुविधा मागणीवरून बीड परळी मार्गावर नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन

मूलभूत सुविधा पुरवाव्यात या मागणीवरून बीड परळी मार्गावर नागरिकांनी आज तासभर रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकातल्या एकानं रस्त्यावरच्या खड्ड्यात झोपत तीव्र भावना व्यक्त केल्या.   दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.तेलगाव नाका परिसरात स्वच्छता करावी तसंच नागरी सुविधा...

September 4, 2024 3:40 PM

views 56

धारशिव इथं प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन

प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन आज धारशिव इथं झालं. या मोहिमेत ६० वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.   १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निवडक व्यक्तींचाही लसीकरणात समावेश असेल. त्यात गेल्या पाच वर्षात उपचार पूर्ण झालेले क्षयरुग्ण, क्षय रुग्णांच्या सहव...

September 4, 2024 5:21 PM

views 14

राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य धैर्यशील पाटील यांचा शपथविधी

राज्यसभेवर निवडून गेलेले भाजपाचे धैर्यशील पाटील यांचा शपथविधी आज झाला. राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. किरण चौधरी, रामेश्वर तेली, जॉर्ज कुरियन, अभिषेक मनु सिंघवी या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधीही आज झाला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.