प्रादेशिक बातम्या

October 9, 2024 6:58 PM

views 35

राज्यात कोणतीही योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याने लाडकी बहीणसह कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. पिंपरी-चिंचवड शहरातल्या विकासकामांचे भूमीपूजन,  उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं सांगून  दे...

October 9, 2024 6:47 PM

views 48

नागरिकांना मिळणारं आरोग्य कवच ५ लाख रुपयांपर्यंत वाढलं – मंत्री प्रतापराव जाधव

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणारं आरोग्य कवच आता प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढलं आहे असं केंद्रीय आयुष आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आयुष्मान संवाद’ हा आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी ...

October 9, 2024 6:25 PM

views 35

एसटीच्या सेवेत सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत पदभरती

सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीतल्या एकूण १ हजार ५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत चालक, आणि वाहक या पदांवर सामावून घेतलं जाणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी ही माहिती दिली.    या भर्तीमध्ये निवड झालेल्यांपैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भर्तीमध...

October 9, 2024 8:09 PM

views 37

वेगवान विकास महाराष्ट्राने याआधी कधीही पाहिला नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

राज्यात गेल्या काही वर्षात विकासाचे अनेक प्रकल्प सुरू झाले आणि त्यातले अनेक पूर्ण झाले आहेत, यापूर्वी एवढा वेगवान विकास महाराष्ट्राने पाहिलेला नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यातल्या सुमारे सात हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज प्रध...

October 9, 2024 3:25 PM

views 35

महायुतीची बुथस्तरावरील समन्वयासाठी विधानसभा समन्वयकांची नियुक्ती

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीने बुथस्तरावरील समन्वयासाठी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांसाठी विधानसभा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या समन्वयकांच्या नावांची घोषणा करण्यात आली.   विधानसभा निवडणुकांचं जागावाटप आणि उमेदवारीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार तिन...

October 9, 2024 3:03 PM

views 32

वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा – मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई महानगर क्षेत्रातलं वायू प्रदूषण रोखणं आणि धूळ नियंत्रित करणं यासाठी मार्गदर्शक तत्‍त्‍वं जारी करण्‍यात आली आहेत, त्‍याची प्रभावीपणे अंंमलबजावणी करावी आणि प्रसंगी दंडात्‍मक कारवाई करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालया...

October 9, 2024 3:34 PM

views 34

रत्नागिरीतल्या ५ नव्याने सुशोभित स्थानकांचं लोकार्पण

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं लोकार्पण आज सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं.  याच कार्यक्रमातून जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या अन्य रेल्वेस्थानकांचं लोकार्पण देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. य...

October 9, 2024 3:35 PM

views 63

विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीची १० उमेदवारांची यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या दहा उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यात मलकापूर, बाळापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ आणि सांगली या जागांसाठी पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे.

October 9, 2024 11:10 AM

views 40

हिंगोली इथं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा

हिंगोली इथं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकार्यांनी निवडणुकीच्या घोषणेपासून ते मतदानाचा निकाल जाहीर करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कामाचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली...

October 9, 2024 10:14 AM

views 58

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा आज बीड तसंच जालना दौरा

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज बीड तसंच जालना दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाण करतील. दुपारी दोन वाजेपर्यंत विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधून सव्वा दोन वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने ते जालन्याकडे प्रयाण करणार आहेत.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.