प्रादेशिक बातम्या

December 24, 2024 8:05 PM

views 50

हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री

राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारी सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्ग...

December 24, 2024 3:19 PM

views 65

उल्हासनगर इथं झालेल्या अपघातात ५ जण जखमी

ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर इथे आज तीन गाड्यांची धडक होऊन झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. उल्हासनगरच्या व्हिनस चौकात आज सकाळी एका गाडीने आधी रिक्षाला आणि नतर एका दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. रिक्षाचालकासह दोन प्रवासी आणि दोन दुचाकीस्वार या अपघातात जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं अ...

December 24, 2024 3:17 PM

views 56

नंदुरबारमधल्या सारंगखेडा महोत्सवात १० दिवसात तीन कोटी रुपयांचे व्यवहार

नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा महोत्सवात अवघ्या दहा दिवसात तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाले. १४ डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरवात झाली. यात देशभरातल्या विविध प्रांतातून २ हजार २१० घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते. यात सहाशे ५७ घोड्यांची खरेदी विक्री झाली असून यातून ३ कोटी २ लाख ५४ हजार ...

December 24, 2024 2:53 PM

views 24

आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला एक सुवर्ण, एक रौप्यपदक

चेन्नई इथं झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं आहे. २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये दीपक पाटील याने सुवर्ण पदक तर ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये हिबा चौगुले हिने रौप्यपदक मिळवलं. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध न...

December 24, 2024 2:53 PM

views 49

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतल्या दक्षिणेकडच्या तुरळक भागांत, २७ डिसेंबर रोजी खानदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी, तर २८ डिसेंबर रोजी...

December 24, 2024 10:19 AM

views 43

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गरीबांसाठी यंदा 19 लाखांहून अधिक घरं देणार -शिवराज सिंह चौहान

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरं यंदा देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल पुण्यात केली. किसान सन्मान दिवसाच्या निमित्ताने पुण्यातील कृषीविज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते...

December 24, 2024 10:19 AM

views 52

शाश्‍वत विकासासाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज – शिवराज सिंह चौहान

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स आणि इकानाॅमिक्स संस्थेच्या अमृत महोत्सव परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते.  आजच्या  राष्ट्रीय शेतकरी दिवसाचं औचित्य साधून,  कृषी संबंधित विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन आणि नविनीकरणाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असून आमच...

December 23, 2024 8:39 PM

views 55

इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं इयत्ता पाचवी आणि आठवीत सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण आज रद्द केलं. आता अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकणार नाहीत. त्यांना दोन महिन्यांच्या आत फेरपरीक्षा देऊन पुढच्या वर्गात जाता येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार ...

December 23, 2024 6:31 PM

views 43

धुळ्यात एका लॉज मधून चौघा बांगलादेशी नागरीकांना अटक

धुळे शहरातील एका लॉज मधून चौघा बांगलादेशी नागरीकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशिररित्या हे चार जण राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या चौघांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती प...

December 23, 2024 3:11 PM

views 10

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्याला अटक

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या जितेंद्र कामताप्रसाद जैस्वाल याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने भाईंदरमधून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रुपयांच्या भांगेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातून रेल्वेने ठ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.