प्रादेशिक बातम्या

December 27, 2024 4:02 PM

views 50

नववर्षी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी स्थानकातून आणि कल्याणहून पहाटे दीड वाजता सुटेल. हार्बर मार्गावर ही विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी आणि पनवेल इथून पहाटे दीड वाजता सुटेल. पश्चिम रेल्वे...

December 27, 2024 11:57 AM

views 64

लातूरमध्ये मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन

लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे.   दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, ...

December 27, 2024 10:45 AM

views 59

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबरला रेल्वेची जलदगती चाचणी

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबर रोजी विघनवाडी ते राजूरी या मार्गावरून रेल्वेची जलदगती चाचणी होणार आहे. या चाचणीदरम्यान रेल्वे मार्गाजवळ कोणीही येवू नये, असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   बीडपासून काही अंतरा...

December 27, 2024 10:38 AM

views 54

जलसंधारणाचं महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाणलोट यात्रा काढण्यात येणार

जलसंधारणाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जल व भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.   वाल्मीला गतवैभव प...

December 26, 2024 3:36 PM

views 50

ठाण्यात टेम्पोमधून ८ लाख ४२ हजार रुपयांचा गुटखा जप्त

ठाणे पोलिसांनी एका टेम्पोमधून ८ लाख ४२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. काल संध्याकाळी भिंवडीतल्या कारीवाली पोलीस चौकीत हा टेम्पो आढळला होता. त्याची तपासणी केली असता त्यातून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आढळले. ठाणे पोलिसांनी ड्रायव्हरलाही अटक केली आहे.  

December 26, 2024 3:20 PM

views 75

निर्यात क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अव्वल

एप्रिल ते आक्टोबर २०२४ च्या कालावधीत निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे यंदाच्या या काळात बुलढाणा जिल्ह्यात ४६५ कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या उत्पादनाची निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून सेंद्रिय रसायने रासायनिक उत्पादने साबण अभियांत्रिक उत्पादने तृणधान्य, दागिने,सोयाबीन, संब...

December 26, 2024 3:17 PM

views 425

अकोल्यात उद्यापासून २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्याचं डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राज्यशासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून येत्या २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय  कृषी प्रदर्शन अकोला इथं भरवण्यात येणार आहे.  प्रदर्शनाचं  उद्घाटन मुख्यमंत्री देव...

December 26, 2024 10:03 AM

views 77

लातूरमध्ये खून प्रकरणी डॉ. प्रमोद घुगेला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचा प्रमुख डॉ.प्रमोद घुगे याला न्यायालयानं ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आपल्याच रुग्णालयातला कर्मचारी बाळू डोंगरे याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ घुगे याला उत्तराखंडातून अटक करून काल न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणातल्या अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

December 26, 2024 12:49 PM

views 30

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा प्रारंभ होत आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखा...

December 26, 2024 3:17 PM

views 54

जम्मू-काश्मीरमध्ये शहीद महाराष्ट्रतल्या २ जवानांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं मंगळवारी झालेल्या एका अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीनं १ कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.