प्रादेशिक बातम्या

January 8, 2025 7:07 PM

views 68

‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशाचं आणि समाजाचं नुकसान करत असलेल्या, न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी, समाजानं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं वाशी इथं आयोजित केलेल्या “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचं उद्घाटन करताना बोलत होते. अंमली पदार्थांच्या माध्यमातून ...

January 8, 2025 7:32 PM

views 51

शासकीय रुग्णालयात दर्जेदार सेवा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागा...

January 8, 2025 7:31 PM

views 55

दोन नक्षलवादी महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो, आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी त्यांची नावं आहेत.   शामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी असून २००२ मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सहभागी झ...

January 8, 2025 7:25 PM

views 69

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७व्या बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाला सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं २७ व्या बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाला काल रात्री सुरुवात झाली. ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन झालं. नाट्यकर्मी बाबा वर्दम यांच्या जन्मदिनानिमित्तानं दरवर्षी या नाट्यमहोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. सात ते तेरा  जानेवारी दरम्यान ह...

January 8, 2025 3:38 PM

views 54

धुळ्यात एका वाहनासह ७७ लाख २० हजार रुपये किंमतीचा बनावट मद्यसाठा जप्त

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात म्हसदी इथं पोलिसांनी एका वाहनासह ७७ लाख २० हजार रुपये किंमतीचा बनावट मद्यसाठा जप्त केला आहे. हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशानं म्हसदी गावातल्या जयेश गुंजाळ यानं आणला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. या प्...

January 8, 2025 3:34 PM

views 28

वीणा उपाध्याय यांना ३१वा ‘जानकीदेवी बजाज पुरस्कार’ प्रदान

श्रीजनी फाउंडेशनच्या संस्थापिका वीणा उपाध्याय यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३१वा 'जानकीदेवी बजाज पुरस्कार' प्रदान केला. आयएमसी चेंबरच्या महिला विभागातर्फे हा पुरस्कार दिला जातो. वीणा उपाध्याय यांनी बावनबुटी साडी विणणाऱ्या महिला कारागिरांना प्रोत्साहन देऊन या कलेचं पुनरुज्जीवन केलं आणि बिहा...

January 8, 2025 3:29 PM

views 45

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण

मुंबई महानगरपालिकेनं नूतनीकरण केलेल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. संग्रहालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन होत असून आपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय उभारणीचा उद्देश आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

January 8, 2025 6:58 PM

views 46

गुजरातमध्ये झालेल्या अपघातात पालघरच्या तीघांचा मृत्यू, ४ जखमी

पालघरच्या तीन तरुणांचा आज सकाळी गुजरातमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हे तिघेही राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्गा इथे गेले होते. तिथून परतताना वाटेत गुजरात इथे अंकलेश्वर जिल्ह्यात त्यांच्या गाडीला ट्रकची धडक बसून अपघात झाला. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात...

January 7, 2025 8:09 PM

views 82

राज्यात सर्व वाहनांना टोल भरण्यासाठी फास्ट-टॅग अनिवार्य

राज्यातल्या चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.  त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड ...

January 7, 2025 7:59 PM

views 157

कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार अमिताभ गुप्ता आणि नीलिम कुमार यांना जाहीर

नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यात २०२२ चा पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना, तर २०२३ चा पुरस्कार आघाडीचे आसामी कवी नीलिम कुमार यांना जाहीर झाला आहे.  रोख ए...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.