प्रादेशिक बातम्या

January 9, 2025 3:19 PM

views 60

सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू- शरद पवार

आपला पक्ष सत्तेत जाणार या अफवा असून सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पक्षपदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.   पुढच्या पंधरा दिवसात पक्षात मोठे बदल पाहायला मिळतील,असंही ते म्हणाले. राज्यात...

January 9, 2025 3:17 PM

views 45

ठाण्यात उद्यापासून २१वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव सुरु

मुंबई आणि ठाण्यात उद्यापासून २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव सुरु होत असून त्याचं उद्घाटन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.   या महोत्सवात ६० हुन अधिक देशी विदेशी चित्रपट सादर होणार असून पटकथा लेखक ...

January 9, 2025 3:15 PM

views 44

शिक्षकांनी बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यं रुजवावीत- राज्यपाल

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षण हे एक महत्त्वाचं साधन आहे. शिक्षकांनी बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यं रुजवावीत, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३३व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. य...

January 9, 2025 1:50 PM

views 72

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक प्रितीश नंदी यांचं काल रात्री निधन

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक प्रितीश नंदी यांचं काल रात्री निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. साहित्यविश्वातल्या योगदानासाठी त्यांना १९७७ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ते राज्यसभेचे खासदारही होते. १९९०च्या दशकात दूरदर्शनवर ‘द प्रितीश नंदी शो’ हा मुलाखतींचा कार्यक्रम ते करत असत.   ‘प्...

January 9, 2025 2:30 PM

views 30

तिरुपतीमधील चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू तर चाळीस जण जखमी

  आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक  व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे, आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हा...

January 9, 2025 10:31 AM

views 33

राज्यात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबवणार – मुख्यमंत्री

महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातील नागरिकाला राज्यातल्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता यावी यासाठी 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' संकल्पना राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत महसूल विभागाच्या बैठकीत सांगितलं.   तसंच घरबसल्या दस्त नोंदणी करण्यासाठी महसू...

January 9, 2025 1:30 PM

views 41

एनआयएफटी संस्थेची मुंबईत पत्रकार परिषद

एनआयएफटी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेनं विकसित केलेल्या, भारतातल्या पहिल्या एआय आणि ईआय आधारित फॅशन फोरकास्टिंग मंचाबद्दल माहिती देण्यासाठी मुंबईत आज वार्ताहर परिषद घेतली. वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी आणि एनआयएफटीच्या संचालक डॉ. शर्मिला राव यावेळी उपस्थित होत्या. वस्त्रोद्य...

January 8, 2025 8:48 PM

views 41

रस्ते अपघातातल्या जखमींसाठी दीड लाखापर्यंत विनारोकड उपचार योजना सुरु

रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विनारोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारनं आजपासून सुरू केली. याअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचारांसाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही. याशिवाय हिट अँड रनमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री न...

January 8, 2025 8:48 PM

views 35

राज्यातल्या खासगी रुग्णालयांची आरोग्य विभागाकडून तपासणी होणार

राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी नियमावली तयार केली आहे. ही तपासणी १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेचे आरोग्यप्रमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सक यांना दिले आहेत. रुग्णालया...

January 8, 2025 7:08 PM

views 44

नागपूरमध्ये राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आयोजन

नागपूरमध्ये १२ ते १४ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं  आयोजन करण्यात आलं  आहे. नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.