प्रादेशिक बातम्या

February 19, 2025 8:44 PM

views 31

पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ आयोजित

दिल्लीत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पहिल्यांदाच पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ आयोजित केलं आहे. या विशेष रेल्वेला महादजी शिंदे यांचं नाव दिलं आहे, तर रेल्वे बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची नावं दिली आहेत. ...

February 19, 2025 8:40 PM

views 47

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना लवकरच युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले आहेत, त्यांना लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने पुण्यात आज जय शिवाजी जय भारत पदय...

February 19, 2025 8:37 PM

views 57

देश – विदेशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ वी जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भव्य मिरवणुका, शोभायात्रा, व्याख्यानं, चित्र आणि शस्त्र प्रदर्शनं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मिरवणुका आणि पदयात्रांमधे शिवकाळ साकारणाऱ्या वेशभूषा तसंच कसरत करतब दाखवणाऱ्या कवायती लक्ष वेधून घेत आहेत. याविषयी जाणून घेऊया...

February 19, 2025 3:42 PM

views 46

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पणन महासंघानं तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी दिली. नऊ केंद्रांवरून हमीभावानं तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसंच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली.   २०२४-२५ हंगामासाठी तूर पिका...

February 19, 2025 3:37 PM

views 46

माध्यमांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी खबरदारी घ्यावी – सर्वोच्च न्यायालय

माध्यमांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी कोणतंही विधान, बातम्या किंवा मतं प्रकाशित करण्यापूर्वी खबरदारी घ्यायला हवी, असं सर्वोच्च न्यायालयाने बजावलं आहे. बिड अँड हॅमर या कंपनीमार्फत लिलाव करण्यात येणाऱ्या काही चित्रांच्या सत्यतेवर बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप एका इंग्रजी ...

February 18, 2025 8:05 PM

views 44

राज्य सरकार बांबू मिशनसाठी त्रिपुरा सरकारसोबत सामंजस्य करार करणार

राज्य सरकार बांबू मिशन लागू करण्यासाठी त्रिपुरा सरकारसोबत सामंजस्य करार करणार आहे. त्यानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आगरतळामध्ये बांबू विकास संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी बांबूच्या विविध प्रकारांची माहिती घेतली. 

February 18, 2025 8:05 PM

views 47

राज्यभरात जय शिवाजी, जय भारत पदयात्रेचे आयोजन

राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं जय शिवाजी, जय भारत या पदयात्रेचं आयोजन केलं आहे. उद्यापासून त्याचा प्रारंभ होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या पदयात्रेचं उद्घाटन करतील. संपूर्ण राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये पदयात्रांचं आयोजन करण्यात आहे. पुणे...

February 18, 2025 8:06 PM

views 49

India’s Got Latent: यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झालेल्या मजकूराच्या चौकशीचे निर्देश

"India's Got Latent" या यू ट्यूब चॅनेलवर तरुण पिढीच्या दृष्टीनं वाईट मजकूर प्रसिद्ध झालेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. दोन वकिलांकडून आयोगाला ही तक्रार मिळाली आहे, असं आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं.

February 18, 2025 7:56 PM

views 65

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा राजीनामा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कुडाळ इथं आज झालेल्या वार्ताहर परिषदेत पडते यांनी राजीनाम्याची घोषणा केली. पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता आपल्याला काम करणं अशक्य असल्याचं पडते यांनी यावेळी सांगितलं. आंगणेवाडीच्या यात्रे...

February 18, 2025 7:54 PM

views 29

पक्ष संघटनेत जनाधार असणाऱ्यांना संधी देण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

काँग्रेसच्या पक्ष संघटनेत यापुढे जनाधार असणाऱ्यांना संधी देणार असल्याचं काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज स्पष्ट केलं. ते आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष पदग्रहण समारंभात बोलत होते.    काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवून संघटना मजबूत करणं हेच आपलं ध्येय आहे. कामाची पद्धत बदलायची आहे. ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.