प्रादेशिक बातम्या

February 17, 2025 9:04 PM

views 22

९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलन गीताचं राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्लीतल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार केलेल्या संमेलन गीताचं प्रकाशन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबईतल्या राजभवनात झालं. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, आता मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठ...

February 17, 2025 9:04 PM

views 52

SBI Mutual Fund: २५० रुपये गुंतवता येतील अशी SIP सुरु

एसबीआय म्युच्युअल फंडने आज अवघे २५० रुपये गुंतवता येतील, अशा SIP ला सुरुवात केली. सर्व महत्त्वाच्या गुंतवणूक व्यासपीठांच्या आधारे SBI म्युच्युअल फंडाच्या विविध योजनात किमान अडीचशे रुपये  SIP द्वारे गुंतवता येतील. याचा फायदा नवीन गुंतवणूदार, असंघटित क्षेत्रातले कामगार तसंच छोट्या बचतीसाठी इच्छुक असणा...

February 17, 2025 8:49 PM

views 43

पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने पहिल्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ आणि २३फेब्रुवारी रोजी लोणीकंद मधल्या हिंद केसरी मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच...

February 17, 2025 8:50 PM

views 45

मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावं-एकनाथ शिंदे

मराठी भाषा विभागानं मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मराठी भाषा विभागाची बैठक आज मुंबईत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मराठी भाषेचं जतन, संवर्धन आणि प्रचारासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्...

February 17, 2025 8:35 PM

views 30

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून, १० मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी सादर करणार आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ मार्चपासून सुरुवात  होणार आहे. पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांचं अभिभाषण होईल.

February 17, 2025 9:44 AM

views 32

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. शेंदुर्णी सहकारी संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ फडणवीस यांच्या हस्ते...

February 17, 2025 9:08 AM

views 17

नाशिक महापालिकेचं कोट्यावधी रुपयांचं अंदाजपत्रक सादर

नाशिक महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ६६ कोटी ३० लाख रुपयांच्या शिलकीचं ३ हजार ५४ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक काल स्थायी समितीला सादर केलं. दोन वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळयासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दोनशे कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

February 17, 2025 8:43 AM

views 21

राज्यातला साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात

राज्यातला साखर हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे ६१ लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून, १४ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. सर्वाधिक १७ लाख टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झालं; तर पुणे विभागात १४ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली. यंदा राज्यात ८५ लाख टन साखर उत्पादनाचा अंद...

February 16, 2025 7:05 PM

views 18

महिलांनी पुढाकार घेतला तर एखादी सहकारी बँक यशाच्या शिखरावर पोहचते- मुख्यमंत्री

महिलांनी पुढाकार घेतला तर एखादी सहकारी बँक यशाच्या शिखरावर पोहचते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. महिलांना अर्थकारण चांगलं कळतं असं ते म्हणाले.न्मित्र महिला नागरी सहकारी ब...

February 16, 2025 7:03 PM

views 56

नांदेड वाहन अपघातात ४ जणाचा मृत्यू, १६ जखमी

उत्तर प्रदेशात बाराबंकी इथं पूर्वांचल एक्सप्रेस वे वर आज पहाटे झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. नांदेडहून आयोध्येला जाणाऱ्या भाविकांची ही टेंपो ट्रॅव्हलर गाडी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त बसला धडकून हा अपघात झाला. प्रवाशांपैकी एकाचा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.