प्रादेशिक बातम्या

February 20, 2025 7:58 PM

views 18

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी २४ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातर्फे निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी २०२२ मधे राजीनामा दिला होता. त्यानंतर २३ पैकी १५ संचालकांना अपात्र ठरवल्यामुळे २३ सदस...

February 20, 2025 7:53 PM

views 36

धुळ्यात १०० दिवसांच्या ई ग्राम संवादाला सुरुवात

धुळे जिल्ह्यात शंभर दिवसांच्या ई ग्राम संवादाला आजपासून सुरुवात झाली. दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकारी नागरिक आणि प्रशासनाशी संवाद साधतील. तसंच गावातल्या तक्रारी, शासकीय योजनांची अंमलबजावणी याची माहिती घेऊन त्याचं निराकारण ...

February 20, 2025 9:01 PM

views 44

GPF खात्यातली शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाईन !

राज्य सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना जीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी खात्यातली शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती प्रधान महालेखापाल जया भगत यांनी दिली.

February 20, 2025 7:48 PM

views 46

रत्नागिरीत महिला प्रभाग संघाच्या हाऊसबोटचं लोकार्पण

रत्नागिरी तालुक्यातल्या राई बंदरात महिला प्रभाग संघातर्फे चालवल्या जाणाऱ्या देशातल्या पहिल्या हाऊसबोटचं लोकार्पण आज झालं. उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. कोतवडे इथल्या एकता महिला प्रभाग संघातर्फे चालवली जाणार आहे. महिलांनी हाऊसबोट चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं, अ...

February 20, 2025 8:46 PM

views 24

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा

राज्याचे कृषिमंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शिवाजी कोकाटे यांना नाशिकमधल्या न्यायालयानं २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी न्यायालयांना दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.    सुमारे २० वर्षांपूर्वी खोटी कागदपत्रे देऊन मुख्यमंत्री कोट्यातली...

February 20, 2025 7:48 PM

views 71

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा

शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापुरात आज १२ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकत्र बैठक झाली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी १२ मार्चला विधानसभा अधिवेशनादरम्यान विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. निवडणुकांपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची महायुतीच्या नेत्या...

February 20, 2025 7:30 PM

views 63

पुण्यात २ जीबीएस रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात आणखी दोन रुग्णांचा गुलियन बॅरे सिन्ड्रोम या आजारानं मृत्यू झाला आहे. या आजारानं आता पर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 211 जणांना जीबीएसचं निदान झालं आहे.

February 20, 2025 7:28 PM

views 28

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५६ कोटींच्या गांजासह ५ जणांना अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ५ प्रवाशांकडून ५६ किलो २६० ग्रॅम वजनाचा गांजा गांजा जप्त केला. या गांजाची किंमत अंदाजे ५६ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. हे पाचही प्रवासी बँकाकहून मुंबईला आले होते. त्यांना अटक करण्यात आली आहे.

February 20, 2025 7:23 PM

views 49

उद्यापासून दहावीची परीक्षा

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यंदा राज्यातल्या 5 हजार 130 मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे...

February 20, 2025 7:20 PM

views 20

मुंबईत ग्रीन शिपिंग परिषद

मुंबईत आज ग्रीन शिपिंग परिषद झाली. समुद्रात होणारं प्रदुषण कमी करण्यावर याचा भर होता. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे महासचिव आर्सेनिओ डॉमनिग्ज आणि केंद्रीय जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यावेळी उपस्थित होते. कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भारताचा भर आहे, असं ते यावेळी म्हणाले. सर्वांनी सागरी संरक्षणासा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.