प्रादेशिक बातम्या

June 4, 2025 7:44 PM

views 13

वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडा तर्फे राज्यात 2 लाख झाडांचं रोपण

येत्या एक ते सात जुलै दरम्यान देशात साजरा करण्यात येणाऱ्या वन महोत्सव सप्ताहानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडा तर्फे राज्यात सुमारे दोन लाख झाडांचं रोपण करण्यात येणार आहे. यापैकी सुमारे ५० हजार झाडं मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात लावण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उ...

June 4, 2025 7:42 PM

views 38

सुधाकर बडगुजर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा होत्या.   पक्षामध्ये संघटनात्मक बदल करताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्यामुळे नाराज असल्याचं बडगुजर यांनी काल सांगितलं होतं. त्यामुळे ...

June 4, 2025 7:38 PM

views 28

बुलढाणा जिल्ह्यात भरधाव जाणाऱ्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली मेहकरदरम्यान भरधाव जाणाऱ्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात तिघेजण मृत्यूमुखी पडले. वेगात जाणाऱ्या ट्रकने चारचाकीला धडक दिली आणि ती चारचाकी दुचाकीवर आदळली, दुचाकीवरचे दोघे आणि  चारचाकीतली एक अशा एकूण तीन व्यक्ती या अपघातात दगावल्या. जखमींवर उपचार सुरु आहेत.

June 4, 2025 7:33 PM

views 30

भारतभेटीवर आलेल्या पॅलासिओस यांनी आज दिली मुंबईला भेट

भारत भेटीनं आपण प्रभावित झाल्याची भावना पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांनी आज व्यक्त केली. तीन दिवसांच्या भारतभेटीवर आलेल्या पॅलासिओस यांनी आज मुंबईला भेट दिली. यावेळी त्यांचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी स्वागत केलं.   जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेल्य...

June 4, 2025 7:24 PM

views 62

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी अजित पवार यांची घेतली भेट

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जपानची भारतात मोठी गुंतवणूक आहे.   रोजगारनिर्मितीबरोबरच राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत मोलाचं योगदान देणाऱ्या जपानी कंपन्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यास...

June 4, 2025 7:20 PM

views 22

आपत्तीग्रस्तांना ४९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात येणार

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी आपत्तीग्रस्तांना ४९ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या संदर्भातला  शासन निर्णय जारी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या निर्णयानुसार राज्य आपत्ती निवारण नि...

June 4, 2025 7:13 PM

views 20

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

नैसर्गिक आपत्तीकाळात सामान्य नागरिकांना झळ बसू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन व्यवस्थापन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री ...

June 4, 2025 7:09 PM

views 31

वनालगतच्या गावांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे लावण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश

राज्यातल्या वनालगतच्या गावांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे लावण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी आज दिले. वन्यजीव आणि मनुष्य संघर्ष टळावा यासाठी हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. विदर्भात सातत्याने होणाऱ्या वन्यप्राणी आणि मनुष्य संघर्षाबाबत आज मंत्रालयात बैठक झाली.   जंगलातील प्राणी ...

June 4, 2025 2:45 PM

views 20

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८ कोटी ६० लाख किमतीचा गांजा जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसात सीमाशुल्क विभागाने ८ कोटी ६० लाख किमतीचा गांजा जप्त केला. बँकॉकहून दोन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या प्रवाशांचा संशय आल्याने त्यांची कसून तपासणी केली असता त्यांनी सामानातून सुमारे साडेआठ  किलो गांजा लपवून आणल्याचं उघडकीस आलं. ...

June 4, 2025 1:44 PM

views 31

प्रत्येकाला घर देणारं ‘महाराष्ट्र’ देशातलं पहिलं राज्य ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रात ८० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणांर महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पुणे इथं प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.