November 3, 2025 12:32 PM
90
प्रधानमंत्री उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं उद्घाटन करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली मध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५ चं उद्घाटन करतील. या कार्यक्रमात ते देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी १ लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना निधीची सुरुवात करतील. शिक्...