राष्ट्रीय

December 23, 2025 8:55 PM

views 139

राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान

जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन इथं झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुकाचे संचालक आर. श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय देशभरातल्या एकूण ८ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री...

December 23, 2025 8:56 PM

views 41

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोदकुमार शुक्ल यांचं निधन

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोदकुमार शुक्ल यांचं आज छत्तीसगडमध्ये रायपूर इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दिवार में एक खिडकी रहती थी, नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, एक छुपी जगह या त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या. त्यातल्या नौकर की कमीजवर चित्रपटही निघाला होता. गेल्या...

December 23, 2025 1:28 PM

views 119

विकसित भारत जी रामजी योजनेसाठी १ लाख ५१ हजार कोटी रुपये तरतूद

विकसित भारत जी रामजी योजनेसाठी १ लाख ५१ हजार कोटी रुपये तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज दिली. चौहान यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितलंय की, आता १०० दिवसांऐवजी सव्वाशे दिवसांच्या रोजगाराची हमी ग्रामीण भागत सरकारने दिली आहे. मनरेगा या पूर्वीच्या योजनेच्या नावाख...

December 23, 2025 10:22 AM

views 79

देशभरात ५ कोटी ८० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी

देशात यावर्षी आतापर्यंत ५ कोटी ८० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधी झालेल्या पेरण्याच्या तुलनेत ही संख्या सुमारे आठ लाख हेक्टरने अधिक आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं १९ डिसेंबरपर्यंतच्या रब्बी पिकांखालील क्षेत्राच्या प्रगतीचा अहवाल प्रसि...

December 22, 2025 6:37 PM

views 100

देशात उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण या विषयावरचा अहवाल प्रसिद्ध

देशात उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण या विषयावरचा अहवाल आज नीती आयोगाने प्रसिद्ध केला. भारतातल्या अग्रगण्य उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने हा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २२ धोरणात्मक शिफारशी, विविध मुद्द्यांवर ७६ उपाययोजना, आणि कामगिरी मूल्यमापनाचे १२५ निकष अहवाला...

December 22, 2025 6:33 PM

views 61

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्धनॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या तक्रारीची दखल घ्यायला सत्र न्यायालयाने नकार दिल्यावर सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली उच्चन्यायालयात धाव घेतली आहे. उच...

December 22, 2025 6:23 PM

views 71

अर्थव्यवस्थेसंबंधीची आकडेवारीसाठीचं आधारवर्ष बदलून नवीन आकडेवारी जाहीर करणार

अर्थव्यवस्थेसंबंधीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यासाठीचं आधारवर्ष बदलून सरकार आता नवीन संदर्भानुसार आकडेवारी जाहीर करणार आहे.  केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की किरकोळ चलनफुगवट्याचा दर १२ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल आणि त्याकरता आधारवर्ष २०२४ असेल...

December 22, 2025 1:35 PM

views 54

राष्ट्रीय महिला आयोगाने तरुण संशोधकांसाठी शक्ती पाठ्यवृत्तीची घोषणा

राष्ट्रीय महिला आयोगाने तरुण संशोधकांसाठी शक्ती पाठ्यवृत्तीची घोषणा केली आहे. महिलांच्या प्रश्नांशी संबंधित धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने संशोधन करू इच्छिणाऱ्या २१ ते ३० वर्षे वयोगटातल्या भारतीय नागरिकांना ही पाठ्यवृत्ती दिली जाईल. ही पाठ्यवृत्ती सहा महिन्यांसाठी असून  त्यासाठी ३१ ड...

December 22, 2025 1:19 PM

views 87

भारत- न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण

भारत- न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी आज दूरध्वनीवरुन चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली. येत्या ३ महिन्यात त्यावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.   न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झ...

December 22, 2025 1:27 PM

views 70

छत्तीसगढमध्ये नक्षल्यांचा हत्यारांचा कारखाना उद्ध्वस्त

छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात सशस्त्रदलांनी मोठी कारवाई करून नक्षलवाद्यांचा एक शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईदरम्यान ८ सिंगल शॉट रायफल्स, मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रास्त्रं तयार करण्यासाठीची उपकरणं आणि सामान जप्त करण्यात आलं. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस दलानं ग...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.