राष्ट्रीय

June 17, 2025 2:38 PM

views 65

दुर्गम आणि आदिवासी भागात २००० वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

केंद्र सरकारनं देशाच्या विविध भागात दोन हजार वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. देशाच्या दुर्गम आणि आदिवासी भागात ही प्रशिक्षण केंद्र सुरू  करण्यात  येतील, यामुळे तरु...

June 17, 2025 8:11 PM

views 38

प्रधानमंत्री मोदी कॅनडामध्ये कनानास्किस इथं होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कॅलगरी इथं पोहोचले. कनानास्किस इथं आयोजित G-7 शिखर परिषदेत ते सहभागी होत आहेत. ऊर्जा संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होईल. प्रधानमंत्री मोदी सहाव्यांदा G-7 शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. ...

June 17, 2025 1:34 PM

views 55

पश्चिम आशियातल्या तणावाला इराण जबाबदार असल्याचा G7 देशांचा दावा

पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, G7 देशांच्या नेत्यांनी आज इस्राएल आणि इराण दरम्यानच्या वाढत्या संघर्षाला संबोधित करणारं एक संयुक्त निवेदन जारी केलं. G7 च्या नेत्यांनी पश्चिम आशियातली शांतता आणि स्थैर्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला असून, इस्राएलच्या स्वसंरक्षणाच्या हक्काला...

June 16, 2025 2:25 PM

views 17

नक्शा क्षमता बांधणी कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होणार

नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज-बेस्ड लँड सर्व्हे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स, अर्थात नक्शा क्षमता बांधणी कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन भूसंपदा विभागाचे सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते आज होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत १२८ नागरी स्थानिक संस्था स्तरावर जिल्हा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

June 16, 2025 1:35 PM

views 45

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा  ‘ग्रँड कोलार ऑफ दी ऑर्डर ऑफ दी मकारिओस थर्ड’ हा सर्वोच्च नागरी सन्मान आज सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्तोदौलिदेस यांनी प्रदान केला. सायप्रसचे पहिले राष्ट्राध्यक्ष आर्चबिशप मकारिओस थर्ड यांच्या नावाचा हा पुरस्कार विविध देशाच्या प्रमुख आणि नामवंत व्यक्...

June 16, 2025 1:24 PM

views 49

भारत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या दहा वर्षात भारताने आपली कार्यक्षमता, वेग आणि अचूक व्यवस्थापन यांच्या बळावर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतकार्य आयुक्त आणि आपत्ती प्रतिसाद दलांच्या परिषदे...

June 16, 2025 1:39 PM

views 47

२०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची अधिसूचना जारी

२०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या जातनिहाय जनगणनेची अधिकृत अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्ध झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत यासंदर्भातल्या तयारीचा आढावा घेण्यात आला.   देशभरात ३४ लाख प्रगणक आणि निरीक्षक, एक लाख तीन हजारांहून जास्त अ...

June 16, 2025 1:39 PM

views 42

अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समितीची बैठक

अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय गृह सचिव बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव, गृहमंत्रालयाचे तसंच गुजरात राज्यशासनाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित असतील. अहमदाबाद वि...

June 16, 2025 1:38 PM

views 68

पश्चिम किनारपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि गुजरातमध्ये पुढील दोन दिवस जोरदार वारे आणि पाऊस पडेल. वायव्येकडची राज्यं आणि दिल्लीत काल तापमान कमी झालं. मान्सून अद्याप पुढे सरकला  नसला तरी कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारीभागात जोरदार पाऊस प...

June 16, 2025 12:51 PM

views 46

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून राज्याच्या उत्तर भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ११ जिल्ह्यातील शाळांना आज सुटी जाहीर केली आहे. रात्रीचा प्रवास करणारे प्रवासी आणि डोंगराळ भागातील पर्यटकांसाठी सुरक्षेसाठीचे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. येत्या गुरुवारपर...