व्यवसाय

March 5, 2025 8:21 PM

views 70

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ७४० अंकांची वाढ

मेक्सिको आणि कॅनडावर लादलेले शुल्क कमी करण्याचे संकेत अमेरिकेनं दिल्यानं देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्स ७४० अंकांची तेजी नोंदवून ७३ हजार ७३० अंकांवर बंद झाला. निफ्टी २५५ अंकांची वाढ नोंदवून २२ हजार ३३७ अंकांवर स्थिरावला. छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या समभागात आज मो...

February 28, 2025 7:09 PM

views 60

देशातले शेअर बाजार ९ महिन्यातल्या नीचांकी पातळीवर

सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार ९ महिन्यातल्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १ हजार ४१४ अंकांची घसरण नोंदवत ७३ हजार १९८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४२० अंकांनी घसरुन २२ हजार १२५ अंकांवर स्थिरावला.  गेल्या वर्षी जून महिन्यात...

February 28, 2025 7:40 PM

views 207

देशाचा जीडीपी ६.२ टक्क्यावर

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन ६.२ टक्के इतका वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा दर ५.६ टक्के इतका होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज सुधारित आकडेवारी जारी केली आहे. यामुळे जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भार...

February 28, 2025 7:41 PM

views 72

कर्मचाऱ्यांच्या ठेवींवर व्याजदर कायम ठेवण्याची EPFOची शिफारस

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाने २०२४-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ ठेवींवर सव्वा ८ टक्क्यांचा व्याजदर कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. मंजुरीनंतरच व्याजाची रक्कम ईपीएफओ खात्यात जमा केली जाईल.

February 26, 2025 1:08 PM

views 76

EPFOमध्ये १६ लाखांहून अधिक सदस्यांची नोंदणी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या एकूण सदस्य संख्येत गेल्या डिसेंबरमधे १६ लाखाची भर पडली. ही सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी सांगते, की नवीन सदस्यांपैकी ४ लाख ८५ हजार सदस्य १८ ते २५ वर्ष वयोगटातले आहेत. 

February 25, 2025 1:41 PM

views 56

खासगी कंपन्यांनी नफा कमावला, कर्ज कमी केलं – RBI

भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात नफा कमावला असून कर्जही कमी केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात दिली आहे. या कंपन्यांचा चालु गुंतवणूक नफा गेल्या वर्षी ४ पूर्णांक २ शतांश टक्के इतका होता, त्यात वाढ होऊन तो आता १५ पूर्णांक ३ दशांश टक्के झाला आहे. तर ...

February 24, 2025 8:53 PM

views 59

दिवसअखेर साडे आठशेहून अधिक अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स ७५ हजारांच्या खाली बंद

जागतिक बाजारातल्या वाढत्या व्यापार तणावामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा ओघ कायम राहिल्याने भारतीय शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ८५७ अंकांनी घसरण झाली आणि तो ७४ हजार ४५४ अंकांवर बंद झाला. आयटी, टेलिकॉम अशा क्षेत्रांच्या समभागांमध्य...

February 21, 2025 3:22 PM

views 66

शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रातल्या समभागांमध्ये घसरण

  गेल्या काही आठवड्यात शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रातल्या समभागांमध्ये घसरण झाली आहे. त्यावर नियामक म्हणून काहीही प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचं मत सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत काल म्युच्युअल फंडांच्या संघटनेच्या परिषदेत त्या बोलत होत्या.

February 18, 2025 1:20 PM

views 55

भारताच्या निर्यातीत ७.२१ टक्के वाढ

२०२४-२५ या आर्थिक वर्षात त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या निर्यातीत ७ पूर्णांक २१ शतांश टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे, तर आयातीत एप्रिल ते जानेवारी या कालावधीत ८ पूर्णांक ९६शतांश  टक्के वाढ नोंदवली गेली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काल जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली.  या काल...

February 17, 2025 9:04 PM

views 67

SBI Mutual Fund: २५० रुपये गुंतवता येतील अशी SIP सुरु

एसबीआय म्युच्युअल फंडने आज अवघे २५० रुपये गुंतवता येतील, अशा SIP ला सुरुवात केली. सर्व महत्त्वाच्या गुंतवणूक व्यासपीठांच्या आधारे SBI म्युच्युअल फंडाच्या विविध योजनात किमान अडीचशे रुपये  SIP द्वारे गुंतवता येतील. याचा फायदा नवीन गुंतवणूदार, असंघटित क्षेत्रातले कामगार तसंच छोट्या बचतीसाठी इच्छुक असणा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.