August 4, 2026 7:55 PM
17
सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशव्यापी दिशानिर्देश जारी
सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात, त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी, असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळव...