July 19, 2024 9:53 AM
55
नीट-यूजी परीक्षेचा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश
नीट युजी २०२४ परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल,उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले आहेत. नीट युजी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या ४० याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर कालपासून सुरु झाली, त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले. एनटीएने शहर आणि परीक्षा केंद्राच्या तपशिलासह, परीक्षार्थींची ओळख कोणत्याही प्रकारे न दड...