October 4, 2024 11:30 AM

views 53

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेला करणार संबोधित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेला संबोधित करणार आहेत. आजपासून ६ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची ही तिसरी आवृत्ती आहे. हरित कार्यपध्दतीला अर्थसहाय्य, जैव-आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन देणं आणि विकासावर होणारे परिणाम, पर्यावरणपूरक बदल टिकवून ठेवण्यासाठी धोरणात्मक कृती आणि तत्त्वं कोणती असावीत या विषयांवर परिषदेत भर दिला जाणार आहे. देशपरदेशातील आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि धोरणकर्ते भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थांसमोरील काही महत्त्वाच्या मुद्द्...

October 1, 2024 3:26 PM

views 86

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जमैकाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर चर्चा

प्रधान नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्रधानमंत्री डॉ अँड्र्यू हॉलनेस यांच्यात आज नवी दिल्ली इथल्या हैदराबाद हाऊसवर अंतराळ, क्रीडा, जागतिक शांतता, चित्रपट निर्मिती आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. दोनही प्रधानमंत्र्यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदनात या बाबतीत माहिती दिली. कोविड विरोधी लसींच्या मदतीसाठी हॉलनेस यांनी भारताचे आभार मानले. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी, दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जमैकाचे प्रधानमंत्री आपल्या चार दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत....

September 23, 2024 2:03 PM

views 47

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.   अमेरीका दौऱ्यात न्यूयार्कमध्ये अमेरीकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधानमंत्री मोदी यांनी घेतली. तिथे ते बोलत होते. कृत्रिम बुद्धीमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यावर या परिषदेने भर दिला. भारतासह जगभरात सगळीकडे नवनव्या तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर आणि त्य...

September 21, 2024 7:59 PM

views 43

क्वाड नेत्यांच्या वार्षिक परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आहे. आज डेलावेअरमधल्या विल्मिंग्टन इथं होणाऱ्या क्वाड नेत्यांच्या सहाव्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. हवामान बदल ते उदयोन्मुख तंत्रज्ञान असे अनेक विषय या परिषदेत चर्चिले जाणार आहेत. कर्करोग रोखण्यासाठी, शोधण्यासाठी आणि त्यावरील उपचारासाठी नाविन्यपूर्ण धोरणाची सुरुवात या परिषदेत होणार आहे.  यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.  अमेरिकेतल्या या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विविध उच...

September 15, 2024 7:48 PM

views 60

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा झारखंडला मोठा धोका – प्रधानमंत्री

संथाल परगणा आणि कोल्हान भागातली लोकसंख्येची स्थिती झपाट्याने बदलत आहे, इथल्या आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे तर घुसखोर वाढत आहेत, या भागाला रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा धोका आहे अशी चिंता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज जमशेदपूर इथं आयोजित परिवर्तन महामेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वासही ...

September 15, 2024 2:45 PM

views 59

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

आज अभियंता दिन, देशाचे महान अभियंता सर एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची प्रगती, नवनिर्मिती आणि नव्या आव्हानांचा सामना करण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

September 14, 2024 8:02 PM

views 41

विकसित भारताचं स्वप्न साकार होण्यासाठी हरियाणाचा विकास महत्त्वाचा आहे – प्रधानमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ कुरुक्षेत्र इथे जाहीर सभा घेऊन केला. विकसित भारताचं स्वप्न साकार होण्यासाठी हरियाणाचा विकास महत्त्वाचा आहे, त्यादृष्टीनं सरकारनं हरियाणाला विकासाच्या प्रवाहात आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं. गरीब, महिला, शेतकरी तसंच युवावर्गाला सक्षम बनवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात गेल्या १०० दिवसांत सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं त्यांनी स्पष्ट...

September 9, 2024 7:40 PM

views 51

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमधले पाच करार

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात आज अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमधले पाच करार झाले. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतभेटीवर आलेले अबुधाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहमद बिन झायद अल नहयान यांच्याशी चर्चा केली. यावेळी भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले संबध, तसंच नव्यानं पुढे येत असलेल्या क्षेत्रांमधे व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत उभय नेत्यांनी विचारविमर्श केला.  शेख खलिद काल संध्याकाळीच दिल्लीत पोचले असून प्रधानमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी राजघाट...

September 7, 2024 10:25 AM

views 48

विद्यार्थ्यांना विविध भाषांमधून लोककथा सांगण्याचं आणि शैक्षणिक सहलीतून भारताची विविधता दाखवण्याचं प्रधानमंत्र्य़ांचं शिक्षकांना आवाहन

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या महत्त्वावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित शिक्षकांसोबत काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी संवाद साधताना मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या परिणामांवर चर्चा केली. शिक्षक विद्यार्थ्यांना स्थानिक लोककथा वेगवेगळ्या भाषांमध्ये शिकवू शकतात, जेणेकरून विद्यार्थी अनेक भाषा शिकू शकतील आणि भारताच्या सतत बदलत्या संस्कृतीचा परिचय देखील करू शकतील असं त्यांनी सुचवलं. प्रधानमंत्री म्हणाले की, शिक्षक आपल्या विद...

September 3, 2024 2:51 PM

views 87

ब्रुनेई आणि सिंगापूर दौरा आसियान क्षेत्रातल्या भारताच्या भागीदारीला आणखी बळ देईल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी ब्रुनेई आणि सिंगापूर या  देशांच्या तीन दिवसीय  दौऱ्यावर रवाना झाले. हे दोन्ही देश भारताच्या ऍक्ट ईस्ट आणि हिंद-प्रशांत महासागर दुष्टीकोनामधले महत्त्वाचे भागीदार असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आपला हा दौरा या दोन्ही देशांसह, आसियान क्षेत्रातल्या देशांबरोबरची भारताची भागीदारी आणखी मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि ब्रुनेई यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ४० वर्ष पूर्ण होत अ...