January 24, 2026 7:57 PM

views 432

१८व्या रोजगार मेळ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून यासाठी विविध देशांशी व्यापार करार केले जात आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित अठराव्या रोजगार मेळाव्याला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते.  रोजगार मेळाव्याद्वारे आतापर्यंत लाखो युवांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली असून हे नियुक्तीपत्र तरुणांना विकसित भारताकडे घेऊन जाणारं संकल्पपत्र आहे, असं त्यांनी सांगितलं.    या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी वि...

January 20, 2026 6:30 PM

views 114

भारत आणि यूएईत संरक्षण, अंतराळ, ऊर्जा, सुपरकंप्यूटिंग आणि अन्न सुरक्षा क्षेत्रांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा केली. या बैठकीदरम्यान, भारत आणि यूएई यांच्यात संरक्षण, अंतराळ, ऊर्जा, सुपरकंप्यूटिंग आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, सामरिक संरक्षण भागीदारी,अंतराळ क्षेत्र आणि त्याच्या व्यापारीकरणासाठीच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यूएईन...

January 14, 2026 6:53 PM

views 105

प्रधानमंत्री येत्या शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२६ निमित्त देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (डीपीआयआयटी) सचिव अमरदीपसिंग भाटिया यांनी आज वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. देशात स्टार्टअप सुरु होऊन दहा वर्ष झाली आहेत, त्यामुळे स्टार्टअपशी संबंधित प्रत्येकासाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे, असं ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात देशातील तीन हजारांहून अधिक स्टार्टअप्स या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

December 20, 2025 6:50 PM

views 85

गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आसाम राज्यामध्ये आज विकासाच्या उत्सवाचा दिवस असून आसामच्या विकासात पुन्हा एकदा एक नवीन अध्याय जोडला जात आहे, तसंच हा केवळ आसामच नाही तर संपूर्ण ईशान्येच्या विकासाचा उत्सव आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुवाहाटी इथं एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गुवाहाटी इथल्या गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उदघाटन मोदी यांच्या हस्ते झालं तसंच  आसामचे पहिले मुख्यमंत्री बारदोलोई यांच्या ८० फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी यावेळी केलं...

December 20, 2025 6:27 PM

views 75

बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य-प्रधानमंत्री

भाजपाचं सरकार पश्चिम बंगाल मधल्या विविध क्षेत्रांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून बंगालचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम बंगाल मधल्या नादिया जिल्ह्यातल्या राणाघाट इथं सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उदघाटन मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते दूरध्वनीच्या माध्यमातून बोलत होते. कार्यक्रमस्थळी दाट धुकं आणि कमी दृश्यमानता असल्यानं प्रधानमंत्र्यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उ...

December 19, 2025 8:17 PM

views 80

पारंपरिक औषधशास्त्राचं महत्त्व वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं-प्रधानमंत्री

पारंपरिक औषधशास्त्राला योग्य ते महत्त्व दिलं जात नसून ते वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. पारंपरिक औषधांवरच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते. पारंपरिक औषधशास्त्राला चालना देण्यासाठी संशोधन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि नियमन आराखडा तयार करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.   या कार्यक्रमात माय आयुष एकात्मिक सेवा पोर्टल, आयुष उत्पादनं आणि सेवांसाठीचं मानक असलेल...

December 15, 2025 12:41 PM

views 102

प्रधानमंत्री दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जॉर्डनला रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जॉर्डन, इथीओपिया आणि ओमान या ३ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. सर्वप्रथम ते जॉर्डनला भेट देतील. या भेटीत ओमानचे राजे अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन आणि प्रधानमंत्री  जफर हुसेन यांच्याशी परस्परसंबंधाबाबत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी रवाना होताना  सांगितलं. याशिवाय ते जॉर्डनमधल्या भारतीय समुदायाचीही  भेट घेणार आहेत. प्रधानमंत्री उद्या इथीओपियाची राजधानी आदीस अबाबा कडे रवाना होतील. प्रधानमंत्री मोदी इथीओपियाच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करतील, तसंच तिथल्या सं...

December 6, 2025 8:27 PM

views 103

जगभरात अनिश्चित वातावरण असताना भारत स्थिर आणि मजबूत-प्रधानमंत्री

जगभरात आर्थिक घसरणीची चिंता व्यक्त होत असताना भारताच्या आर्थिक विकासदरात मोठी वाढ होत असून महागाईचा दर घसरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. नवी दिल्लीत एका खासगी प्रसारमाध्यमानं आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते.   जगभरात अनिश्चित वातावरण असताना भारत स्थिर आणि मजबूत आहे. जगभरातले देश एकमेकांवर विश्वास ठेवायला मागे-पुढे पाहत असताना भारत हा विश्वासार्ह पर्याय म्हणून सर्वांच्या मदतीला येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.  भारताने कोणत्या देशाशी कसे संबंध ठेवावेत हा भारताचा अधिकार...

November 26, 2025 1:00 PM

views 104

सॅफरान विमान इंजिन देखभाल दुरुस्ती सुविधेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं S A E S I अर्थात सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्विसेस इंडिया सुविधेचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केलं. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ असणारा देश आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. भारताने नेहमीच गुंतवणूक आणि नवोन्मेषाचं स्वागत केलं असून उत्पादन संबंधी प्रोत्साहन योजनेमुळे जगभरातल्या कंपन्या भारताला गुंतवणुकीसाठी पसंती देतात, भारत गुंतवणूकदारांकडे केवळ गुंतवणूकदार म्हणून न पाहता सह-निर्माता म्हणून पाहत...

November 15, 2025 7:23 PM

views 92

गुजरातमध्ये ९ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन

 आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय जाणीवांचा अविभाज्य भाग आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी ९ हजार ७०० कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या विकास योजनांच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासी समाजाला शिक्षण, आरोग्य आणि पा...