November 4, 2025 8:05 PM

views 85

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस यश मिळेल-प्रधानमंत्री

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस यश मिळेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी आज मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत बिहारमधल्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मागच्या 20 वर्षांमधले सर्व विक्रम मोडीत काढेल असा निश्चय इथल्या मतदारांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

November 3, 2025 12:32 PM

views 112

प्रधानमंत्री उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली मध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५ चं  उद्घाटन करतील. या कार्यक्रमात ते देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी १ लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या  संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना निधीची सुरुवात करतील.    शिक्षण तज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकार मधल्या ३ हजारापेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या तीन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. यामध्ये भाषणं, पॅनेल चर्चा, सादरीकरणं आणि तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनं आय...

October 29, 2025 9:13 PM

views 101

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असून भारताच्या नौवहन सामर्थ्यावर जगाचा विश्वास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांनी केलं. मुंबईत सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते आज संबोधित करत होते. मागच्या  दशकभरात नौवहन क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झालं असून व्यापार आणि बंदरे पायाभूत सुविधांना चालना मिळाली असं प्रधानमंत्री म्हणाले. सरकारनं नौवहन क्षेत्रात सुधारणांसाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत, शतकभर जुने कायदे बदलून २१ व्या शतकातले आधुनिक कायद...

October 28, 2025 3:17 PM

views 107

इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला प्रधानमंत्री उद्या संबोधित करणार

मुंबईमध्ये सुरु असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या संबोधित करणार आहेत. यावर्षीच्या इंडिया मेरिटाईम परिषदेत जागतिक स्तरावरील नील अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते उपस्थितांशी संवाद साधतील.   सागरी अमृत काल व्हिजन २०४७ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी, भविष्याभिमुख सागरी परिवर्तनासाठीची वचनबद्धता दर्शवणारा हा उपक्रम आहे. यामध्ये जलवाहतूक, बंदरे, जहाजबांधणी, क्रूझ पर्...

October 9, 2025 8:52 PM

views 97

जगभरातल्या देशांना आणि उद्योजकांना भारतात गुंतवणुकीसाठी प्रधानमंत्र्यांचं आवाहन

जगभरातल्या सर्व देशांनी भारतासोबत भागिदारी करावी आणि जगातल्या सर्व गुंतवणूकदारांनी भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासोबत उद्योजकांना त्यांनी संबोधित केलं.   (ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताकडून होत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. जनहितासाठी भारतात डिजिटल पायाभूत...

October 8, 2025 7:29 PM

views 203

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा, आणि मुंबई १ ॲपचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकिट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि आयटीआयमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी आज नवी मुंबईतून केला.   ८ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते झालं. डिसे...

September 27, 2025 3:16 PM

views 64

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ओदिशात झारसुगडा इथं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मोबाईल 4G टॉवर्सचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. झारसुगुडा इथं आयोजित कार्यक्रमात साठ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी केली.  दूरसंचार, रेल्वे, उच्च शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्र अशा विविध क्षेत्रांतल्या प्रकल्पांचा त्यात समावेश  आहे. गरीबांना हक्काचं पक्कं घर मिळवून देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी भाषणात सांगितलं.    दूरसंचार क्षेत्रात, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुम...

September 20, 2025 8:24 PM

views 79

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या मुंबई क्रुझ टर्मिनलचं लोकार्पण

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत म्हणजे २०४७पर्यंत विकसित व्हायचे असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गुजरातमधल्या भावनगरमध्ये समुद्र से समृद्धी तक या कार्यक्रमात ते बोलत होते.    यावेळी त्यांनी ३२ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. त्यात मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच्या उद्घाटनाचाही समावेश आहे. सव्वा ४ लाख वर्गफूट क्षेत्रफळावरं उभं राहिलेलं हे देशातलं सर्वात मोठं क्रुझ टर...

September 18, 2025 1:22 PM

views 135

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. नेपाळमधील सद्यस्थितीबद्दल चर्चा केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी युवा पिढीनं केलेल्या आंदोलनात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. नेपाळमध्ये शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना भारताचा ठाम पाठिंबा आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. नेपाळमध्ये उद्या साजरा केल्या जाणाऱ्या राष्...

September 14, 2025 8:22 PM

views 68

ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून परदेशी इंधनावरचं अवलंबित्व कमी होत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममधल्या गोलाघाट जिल्ह्यात बांबूंपासून बनवलेल्या पहिल्या जैव शुद्धीकरण आणि जैव इथेनॉल प्रकल्पाचं उदघाटन तसंच नुमालीगड इथल्या पॉलीप्रोपीलीन प्लांटची पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते.  सौर ऊर्जेसंदर्भात भारताची गणना जगातल्या  आघाडीच्या ५ देशांमध्ये होत  असून खोल पाण्याखालच्या ऊर्जा स्रोतांचा वापर करुन भारत ऊर्जेच्या बाबतीत स...