August 20, 2024 7:42 PM

views 63

भारत आणि मलेशियानं धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्याचा निर्णय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे प्रधानमंत्री दातो सेरी अन्वर बीन इब्राहीम यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर विविध करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. श्रम आणि रोजगार, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधी, डिजिटल तंत्रज्ञान, संस्कृती, पर्यटन, तसंच युवा कल्याण आणि क्रीडा या क्षेत्रांबद्दल हे करार करण्यात आले. सामान्य प्रशासन, प्रशासकीय सुधारणा, आणि परस्पर सहकार्याबाबतही दोन्ही देशात करार करण्यात आले.  भारत आणि मलेशियानं धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमं...

July 14, 2024 3:03 PM

views 61

गेल्या काही वर्षांत ८ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाल्याने बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं – प्रधानमंत्री

गेल्या तीन ते चार वर्षांत आठ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाली असून त्यामुळे देशात बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल झालेल्या जाहीर कार्यक्रमात या संदर्भातली आकडेवारी आणि आरबीआयच्या अहवालाचा हवाला देत, देशात कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि सरकार या दिशेने काम करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.   अफवा पसरवणारे गुंतवणुकीचे, पायाभूत सुविधांच्या विकासाचे आणि देशाच्या विकासाचे शत्रू आहेत, असं मोदी म्हणाले. महाराष्...

July 14, 2024 7:25 PM

views 70

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रंप यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला

  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला असून राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही असं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ट्रंप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यातल्या मृतांचे कुटुंबीय, जखमी व्यक्ती आणि अमेरिकी नागरिकांच्या दुःखात भारत सहभागी आहे, असंही त्यांनी सांगितलं.    अमेर...

July 14, 2024 12:19 PM

views 68

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे – प्रधानमंत्री

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक स्तरावर प्रशंसा झालेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचं उदाहरण देऊन या उपक्रमाला प्रसारमाध्यमं लोक चळवळ बनविण्यात मदत करू शकतात असं पंतप्रधानांनी सांगितलं.   ‘विकसीत भारत’च्या आगामी २५ वर्षांच्या प्रवासात वर्तमानपत्रं आणि मासिकांची महत्वाची भूमिका असल्याचं नमूद करत लोकांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देत असल्याबद्दल त्यांनी प्र...

June 29, 2024 3:42 PM

views 75

पंतप्रधान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम ऐकता येईल.  

June 19, 2024 8:51 PM

views 70

देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आणि परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी नालंदा विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले.    शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक भागिदारी यामुळं तयार होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. जागतिक...

June 14, 2024 3:19 PM

views 112

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोनासनावरील चित्रफीत समाज माध्यमावर केली प्रसारित

येत्या २१ जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोणासन करतानाचा व्हिडियो समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. आरोग्यासाठी हे आसन कसं करावं याची माहिती त्यात प्रधानमंत्र्यां दिली आहे. खांदे, पाठ यांची कार्यप्रवणता सुधारण्यासाठी आणि एकाग्रता वाढीसाठी हे आसन करावं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे.