September 17, 2024 4:38 PM

views 60

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७४व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी त्यांच्या कार्यातून देशाची समृद्धी आणि प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांना निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा, असं राष्ट्रपती मुर्मू आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या आहेत. तर मोदी यांनी प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात भारताला विकासाच्या मार्गावर नेलं असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या संद...

September 17, 2024 2:09 PM

views 41

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात ‘सुभद्रा’ योजनेचा प्रारंभ करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात भुवनेश्वर इथं ओदिशा राज्य सरकारच्या ‘सुभद्रा’ या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यभरातल्या २१ ते ६० वयोगटातल्या पात्र लाभार्थी महिलांना, पाच वर्षांत ५० हजाराचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. या अंतर्गत वर्षभरात दोन हप्त्यांमध्ये १० हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १० लाखापेक्षा जास्त लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा केला जाईल, तसंच ते लाभार्थी महिलांशीही संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्र...

September 17, 2024 11:14 AM

views 71

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण केले आहेत. मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम आणि निर्णय घेण्यात आले आहेत, आणि विकसीत Bharat@2047 यांचा भक्कम पायाभरणी केली आहे.  

September 17, 2024 11:00 AM

views 47

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून सुरू होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी देशवासियांना ई-लिलावात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या लिलावाद्वारे मिळणारा निधी नमामि गंगे योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. यावर्षी लिलावाचा सहावा हप्ता असून सुरुवातीला 2019 मध्ये या प्रकारची सुरुवात करण्यात आली होती. लोक आजपासून आपल्या आवडत्या स्मृतिचिन्हासाठी बोली लावू शकतात. ऑनलाइन लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

September 17, 2024 10:01 AM

views 39

पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे, नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून लोकार्पण

राज्यातल्या तीन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे आणि नागपूर सिकंदराबाद मार्गांवर या गाड्या धावतील. पुणे हुबळी वंदे भारत रेल्वेला नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पुण्यातल्या रेल्वे स्थानकावरुन रवाना करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या गाडीमुळे राज्यातल्या प्रवाशांचा प्रवास सुख...

September 16, 2024 6:53 PM

views 32

अहमदाबाद ते गांधीनगर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला प्रधानमंत्र्यांचा हिरवा झेंडा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद ते गांधीनगर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला. तसंच अहमदाबाद ते भुज या वंदे भारत मेट्रोसह ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. अहमदाबाद ते भुज ही देशातली पहिली वंदे भारत मेट्रो आहे. सध्याचा काळ हा भारतासाठी सुवर्णकाळ असून पुढच्या २५ वर्षांत भारताचा समावेश विकसित देशांमध्ये होईल, असा विश्वास मोदी यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला.

September 16, 2024 3:24 PM

views 35

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज – प्रधानमंत्री

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून सरकारनं २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलत होते. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेला संबोधित करताना प्रधानमंत्र्यांनी भारताने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.   भारतान...

September 16, 2024 9:35 AM

views 40

विस्तारीत रेल्वे जाळ्यामुळे पूर्व भारतातल्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल- प्रधानमंत्री

पूर्व भारतातल्या विस्तारित रेल्वे जाळ्यामुळं संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंड राज्याची राजधानी रांची इथं ते काल बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून काल साडेसहाशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं भूमीपूजन तसंच लोकार्पण करण्यात आलं. याचवेळी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ माध्यमातून सहा नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.   प्रधानमंत्री जमशेदपूरमधल्या टाटानगर ...

September 15, 2024 8:03 PM

views 46

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवला ६ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा

सबका साथ सबका विश्वास या मंत्रानं देशात विचारधारा आणि प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल केला असून गरीब, आदिवासी, दलित, वंचित, मागासवर्गीय, महिला, युवावर्ग आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे, असं प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या झारखंड दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज ६ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्य्रक्रमात प्रधानमंत्र्यांनी ६६० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पणही केलं...

September 14, 2024 8:19 PM

views 26

शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय अधोरेखित करत अशा निर्णयांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल तसंच ग्रामीण भागात अधिक रोजगार निर्माण होतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. देशाच्या अन्न सुरक्षेमध्ये शेतकऱ्यांची मोलाची भूमिका आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे. कांद्यावरच्या  निर्यात शुल्कात कपात करण्याच्या तसंच खाद्यतेलावरचं आयातशुल्क वाढवण्याच्...